NASA ने शेअर केलेला हा फोटो पाहिलात? तुम्हालाही हात दिसतोय का पाहा?
NASA Photo | (Photo Credits: Instagram)

नेशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस एडमिनिस्ट्रेशन(National Aeronautics and Space Administration) म्हणजेच नासा (NASA) च्या एका सोशल मीडियाच्या इंस्टाग्राम पेजवरुन एक छायाचित्र शेअर करण्यात आले आहे. हे छायाचित्र नासा चंद्रा एक्स-रे ऑब्जर्वेटरी (NASA Chandra X-ray Observatory) ला समर्पित करण्यात आले आहे. या पेजवरुन नेहमीच वेगवेगळी छायाचित्रे शेअर केली जातात. या पेजचे वैशिष्ट्य असे की या पेजवरुन जी छायाचित्रे शेअर केली जाता ती नेहमीच चर्चा, उत्सुकता वाढवणारी आणि आश्चर्यचकीत करणारी असतात. नासाने या पेजवरुन नुकतेच एक छायाचित्र शे्र केले आहे. ज्यामुळे अनेकांना आश्चर्य वाटते आहे. हे छायाचित्र नेब्युला (Nebula) बद्दल आहे.

नासाने शेअर केलेल्या फोटोत मानवी शरीर आणि एका हाताची प्रतिकृती दिसते. प्रत्यक्षात हे मानवी शरीर किंवा हात नसला तरी एकूण संरचना पाहिली तर तो मानवी हात असल्याचेच भासते. अवकाशातील एक तारा फुटल्यानंतर निघालेल्या #pulsar मधून निर्माण झालेल्या उर्जा कणांच्या स्फटीकामधून हे चित्र तयार झाले आहे. हा पल्सर ज्याला PSR B1509-58 नावाने ओळखले जाते त्याचा सर्वसाधारण व्यास 19 कमी (12 मैल) व्यासाचे आहे. हा प्रति सेकंद कमीत कमी 7 वेळा फिरतो. (हेही वाचा, चुकीच्या माहितीच्या आधारावर झाली औरंगाबादच्या दीक्षा शिंदेची NASA पॅनलवर निवड; नासाच्या ईमेलमधून समोर आले धक्कादायक सत्य)

नासा पोस्ट

नासाने आपल्या इन्स्टा पेजवरुन हा फोटो शेअर केल्यानंतर तो आतापर्यंत 25 लोकांनी लाईक केला आहे. अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत तर खूप लोकांनी शेअरही केला आहे. लाईक, शेअर आणि कमेंट याची संख्या सातत्याने वाढते आहे. एका युजर्सने इन्स्टाग्राम युजर्सने विचारले 'हा हात देवाच्या रुपात मानला जातो?' यावर नासाने प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, हा, एक अनेक लोकप्रिय उपनावांपैकी एक आहे. दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, हे खूपच सुंदर आहे. यावर नासाने धन्यवाद म्हटले आहे. आणखी एक युजर म्हणतो हे खूपच अविश्वसनी, अद्भुत असे आहे.