Realme X7 Max 5G अखेर भारतात लाँच, 64MP कॅमेरा असलेला हा स्मार्टफोन 'येथे' होणार ऑनलाईन विक्रीसाठी उपलब्ध
Realme X7 Max 5G स्मार्टफोन 8GB RAM + 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 26,999 रुपये आहे. तर 12GB RAM + 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 29,999 रुपये आहे. फोनचा पहिला सेल 4 जूनला दुपारी 12 वाजता सुरु होईल. हा स्मार्टफोन तीन रंगात उपलब्ध होईल.
रियलमीच्या चाहत्यांना आतुरता असलेला या कंपनीचा नवा स्मार्टफोन Realme X7 Max 5G अखेर भारतात लाँच झाला आहे. हा स्मार्टफोन दमदार फिचर्ससह लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनचे सर्वात खास वैशिष्ट्य म्हणजे यात 64MP चा कॅमेरा देण्यात आला आहे. ज्यामुळे तुम्हाला फोटोग्राफीचा खूप जबरदस्त अनुभव मिळेल. हा स्मार्टफोन ऑनलाईन शॉपिंग साइट फ्लिपकार्ट आणि रियलमीच्या अधिकृत वेबसाईट Realme.com वर उपलब्ध करण्यात आला आहे.
Realme X7 Max 5G स्मार्टफोन 8GB RAM + 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 26,999 रुपये आहे. तर 12GB RAM + 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 29,999 रुपये आहे. फोनचा पहिला सेल 4 जूनला दुपारी 12 वाजता सुरु होईल. हा स्मार्टफोन तीन रंगात उपलब्ध होईल.हेदेखील वाचा- Realme C25s स्मार्टफोन लवकरच भारतात होणार लॉन्च, जाणून घ्या किंमतीसह खासियत
Realme X7 Max 5G च्या डिस्प्लेविषयी बोलायचे झाले तर, यात 6.43 इंचाची FHD+ सुपर अमोल्ड डिस्प्ले देण्यात आली आहे. 120Hz रिफ्रेश, 1000nits ची ब्राइटनेस, 360Hz टच सॅपलिंग रेट आणि पंच होल कटआऊटसह येतो. हा स्मार्टफोन MediaTek Dimensity 1200 प्रोसेसरसह येतो. हा डिवाईस Android 11 वर आधारित Realme UI 2.0 वर काम करतो. या स्मार्टफोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसरसुद्धा दिला आहे.
या स्मार्टफोनच्या कॅमे-याविषयी बोलायचे झाले तर, यात 64MP चा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. तर 8MP चा वाइड अँगल लेन्स आणि 2MP चा मॅक्रो लेन्स देण्यात आला आहे. फ्रंट कॅमे-यासाठी यात 16MP चा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)