PUBG Mobile Season 9 आजपासून झालं उपलब्द; Royale Pass मुळे युजर्सना मिळणार भन्नाट फीचर्स
PUBG 0.14.5 अपडेट मध्ये पबजीच्या 9 व्या सीझन सोबतच रॉयल पास देखील उपलब्ध करण्यात आला आहे. यानुसार मिशनमध्ये मोठे बदल करण्यात आले आहे. युजर्सना आता काऊंटडाऊन टाईम, प्रति आठवडा मिशन तयार करण्यासाठी रिमाईंडर सेट करता येणार आहेत
जगभरात तरूणाईला वेड लावणार्या PUBG या ऑनलाईन मोबाईल खेळामध्ये आता नवा अपडेट आला आहे. या खेळाच्या चाहत्यांना आज (13 सप्टेंबर) पासून बहुप्रतिक्षित PUBG Mobile Season 9 warrior-themed Royale Pass उपलब्ध झाला आहे. आता अॅन्ड्रॉईड आणि आयओएस वर हा अपडेट उपलब्ध करण्यात आला आहे. PUBG 0.14.5 अपडेट मध्ये पबजीच्या 9 व्या सीझन सोबतच रॉयल पास देखील उपलब्ध करण्यात आला आहे. यानुसार मिशनमध्ये मोठे बदल करण्यात आले अअहे. युजर्सना आता काऊंटडाऊन टाईम, प्रति आठवडा मिशन तयार करण्यासाठी रिमाईंडर सेट करता येणार आहेत. या नव्या सीझनमध्ये वॉरियर यूनाइट (Warrior Unite)या थीममध्ये बनवण्यात आला आहे.
कसे मिळवाल PUBG Mobile Season 9 Royale Pass
पबजी खेळाची लोकप्रियता पाहता मागील आठवड्यातच सीझन 9 बद्दल घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार 13 सप्टेंबरच्या मध्यरात्रीपासून 0.14.5 update जाहीर करण्यात आला आहे. आता भारतामध्ये अॅप स्टोअर आणि गूगल प्ले स्टोअर वर या नव्या सीझनचे अपडेट जारी करण्यात आले आहेत. त्यामुळे तुम्ही हे मोफत अपडेट करू शकणार आहात.
Royal Pass Season 9 कसं असेल?
पबजी खेळामधील 9 व्या सीझनच्या अपडेटनंतर ल्गेजच युजर्सना त्याचा रॉयल पास मिळणार आहे. या सीझनची नवी थीम प्राचीन जपानी वॉरियर समुराई (Samurai) आणि निंजा (Ninja)यावर आधारित आहे. काही एक्सक्लुझीव्ह व रॉयल पास मध्ये ऑबज़र्वर सेट (Observer Set), इनफेक्टेड ग्रिज़ली M249 (Infected Grizzly M249), ऑब्ज़र्वर कवर (The Observer Cover), इन्फेक्टेड ग्रिज़ली डैशिया (Infected Grizzly Dacia), ली टिगर सेट (Le Tigre set), ड्रैकोनियन चैम्पियन सेट (Draconian Champion set)सोबत अनेक आकर्षक गोष्टी मिळणार आहेत. तसेच नवी अवतार फ्रेम, हेल्मेट, पैराशूट, आणि बॅग स्किन असेल. या अपडेटसोबत नवे इमोट मिळतील.
पबजी मोबाईल खेळामधील 0.14.5 अपडेटचं खास आकर्षण म्हणजे यामध्ये अअता हॅलिकॉप्टर उडवण्याची परवानगी देखील युजर्सला आता मिळणार आहे. आतापर्यंत जमीनीवर विविध मॅप्सच्या माध्यमातून हॅलिकॉप्टर पाहता येत होते पण आता हे उडवायला मिळणार असल्याने नव्या सीझन आणि रॉयल पासला आजमवणार्यासाठी या खेळाच्या चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)