पेटीएम वापरकर्त्यांनो सावधान! 10 हजारांहून अधिक रुपयांचा व्यवहार करत असाल तर, हे नक्की वाचा
यातच ऑनलाईन व्यवहारावर अधारित ऍप पेटीएमने (PayTM) त्यांच्या ग्राहकांना निराश केले आहे.
ऑनलाईन व्यवहार (Online Transaction) करण्याच्या प्रमाणात अधिक वाढ झाली असून अनेकजण ऑनलाईन वॉलेटचा अधिक वापर करत आहेत. यातच ऑनलाईन व्यवहारावर अधारित ऍप पेटीएमने (Paytm) त्यांच्या ग्राहकांना निराश केले आहे. पेटीएम कंपनीच्या नव्या पॉलिसीनुसार, पेटीएम वापरकर्ते यापुढे आपल्या वॉलेट किंवा क्रेडीट कार्डच्या माध्यमातून एका महिन्यात 10 हजारांहून अधिक रुपयांचा व्यवहार करतात तर, त्यांना 2 टक्के चार्ज द्यावे लागणार आहे. नुकतेच पेटीएमने यासंदर्भात माहिती दिली आहे. यामुळे पेटीएम वापरकर्त्यांमध्ये निराशाजनक वातावरण निर्माण झाले आहे.
माहितीनुसार, डेबिट कार्ड आणि यूपीआयच्या माध्यमातून वॉलेट टॉपअप केल्यास कोणतेही चार्ज द्यावा लागणार नाही. पेटीएमने आपल्या अधिकृत ट्वीटर हॅंडलवरून याची माहिती दिली की, जर एखाद्याने आपल्या क्रेडीट कार्डच्या माध्यमातून 10 रुपयांपेक्षा अधिक पैशाचा व्यवहार केला तर त्याला 1.75 टक्के जीएसटी चार्ज द्यावे लागणार आहे. याआधीही पेटीएम कंपनी अशाप्रकारची योजना बनवली होती. मात्र, त्यावेळी कंपनी काही कारणानिमित्त पुढे ढकलली होती. हे देखील वाचा- Instagram युजर्ससाठी TikTok सारखे फिचर्स रोलआऊट
विजय शेखर यांचे ट्वीट-
पेटीएमचे संस्थापक, विजय शेखर यांनी आपल्या ट्वीटरच्या खात्यावरून माहिती दिली होती की, त्यांनी एक क्यूआर कोड लॉन्च केला आहे. याच्या मदतीने पेटीएम वॉलेट, रुपे कार्ड आणि सर्वप्रकारचे यूपीआई आधारित ट्रान्झेक्शन ऍपच्या माध्यमातून आपले व्यवहार थेट बॅंकेच्या अकांऊटमधून करता येणार आहे. महत्वाचे म्हणजे, अशा प्रकारे व्यवहार करणाऱ्या वापरकर्त्यावर कोणत्याही प्रकारचे कर लावला जाणार नाही, अशी माहिती वियज शेखर यांनी दिली आहे.