Noise ColorFit Ultra 2 स्मार्टवॉच लॉन्च, जाणून घ्या किंमतीसह अधिक

या स्मार्टवॉचचे डिझाइन शानदार आहे. यामध्ये पॉवरफुल बॅटरी दिली असून ती सिंगल चार्जमध्ये 7 दिवसांचा बॅकअप देते.

Noise ColorFit Ultra 2 (Photo Credits-Twitter)

Noise चे शानदार स्मार्टवॉच Noise Colorfit Ultra 2 भारतात लॉन्च करण्यात आले आहे. या स्मार्टवॉचचे डिझाइन शानदार आहे. यामध्ये पॉवरफुल बॅटरी दिली असून ती सिंगल चार्जमध्ये 7 दिवसांचा बॅकअप देते. या व्यतिरिक्त कॉल-मेसेज नोटिफिकेशन सारखे लेटेस्ट फिचर्स ते एमोलेड स्क्रिन पर्यंतचा सपोर्ट मिळणार आहे. नॉइस कलरफिट 2 च्या किंमतीसह अन्य फिचर बद्दल येथे अधिक जाणून घ्या.(Noise Beads TWS इअरबड्स भारतात लॉन्च, युजर्सला मिळणार 18 तासांचा प्लेबॅक टाइम)

या स्मार्टवॉचची किंमत 4,999 रुपये असून ते कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरुन खरेदी करता येणार आहे. हे वॉच जेट ब्लॅक, नेवी गोल्ड, ऑलिव ग्रीन आणि सिल्वर ग्रे रंगाच्या ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. तसेच या स्मार्टवॉचसाठी स्टेनलेस स्टीलचा वापर करण्यात आला आहे. यामध्ये 1.78 इंचाची एमोडेल स्क्रिन दिली आहे. याचे रेजॉल्यूशन 368X448 पिक्सल आहे. यामध्ये ऑलवेज ऑन डिस्प्ले फिचर दिले आहे. तसेच युजर्सला नव्या स्मार्टवॉचमध्ये 60 हून अधिक स्पोर्ट्स मोड, ब्लड ऑक्सिजन आणि हार्ट-रेट मॉनिटर करण्याची सुविधा मिळणार आहे.

अन्य फिचर्स बद्दल बोलायचे झाल्यास या स्मार्टवॉचमध्ये वेदर, क्विक रिप्लाय, वर्ल्ड क्लॉक, म्युझिक, कॅमेरा, स्टॉक, फ्लॅश लाइट, स्मार्ट डीएनडी, कॅलक्युलेटर, कॉल आणि मेसेज नोटिफिकेशन सारखे फिचर दिले आहेत. तसेच स्मार्टवॉचमध्ये दमदार बॅटरी ही दिली गेली आहे.(Infinix ने भारतात लाॅन्च केले दोन दमदार स्मार्टफोन, जाणून घ्या अधिक)

कंपनीने या वर्षाच्या सुरुवातीला नॉइस कलरफिट प्रो-3 लॉन्च केले होते. याची किंमत अत्यंत कमी ठेवली आहे. तसेच स्मार्टवॉचमध्ये 1.55 इंचाची स्क्रिन दिली आहे. याचे रेजॉल्यूशन 320X360  पिक्सल आहे. यामध्ये हार्ट-रेट आणि ब्लड ऑक्सिजन मॉनिटर करण्याची सुविधा ही दिली आहे. या व्यतिरिक्त वॉचमध्ये 210MAH ची बॅटरी दिली असून ती सिंगल चार्जमध्ये 10 दिवसांचा बॅकअप देणार आहे.