Microsoft ने लॉन्च केला Surface सीरिज मधील सर्वात स्वस्त लॅपटॉप, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन

मायक्रोसॉफ्ट (Microsoft) कंपनीने त्यांचा Surface सीरिज अंतर्गत एक सर्वात स्वस्त असा लॅपटॉप Microsoft Surface Go अधिकृतरित्या लॉन्च केला आहे. या व्यतिरिक्त कंपनीकडून अपडेटेड Surface Pro X सुद्धा बाजारात उतरवला आहे.

Microsoft (Photo Credit: Getty)

मायक्रोसॉफ्ट (Microsoft)  कंपनीने त्यांचा Surface सीरिज अंतर्गत एक सर्वात स्वस्त असा लॅपटॉप Microsoft Surface Go अधिकृतरित्या लॉन्च केला आहे. या व्यतिरिक्त कंपनीकडून अपडेटेड Surface Pro X सुद्धा बाजारात उतरवला आहे. जो पहिल्याच्या तुलनेत काही खास फिचर्सपेक्षा लैस आहे. दरम्यान, मायक्रोसॉफ्ट सरफेस गो सध्या युएसए मध्ये लॉन्च करण्यात आला आहे. तर सरफेस प्रो एक्स भारतात सेलसाठी उपलब्ध करुन दिला जाणार आहे.(Amazon Wow Salary Days Sale: लॅपटॉप, टीव्ही, फ्रिज, एसी यांसह 'या' वस्तूंवर भरगोस सूट; पहा ऑफर्स)

Microsoft Surface Go युएसएमध्ये $549.99 म्हणजेच 40,300 रुपयांच्या किंमतीत लॉन्च केला आहे. तसेच याची प्री-बुकिंग सुद्धा करण्यात येणार आहे. हा लॅपटॉप आइस ब्लू, स्टँडस्टोन आणि प्लॅटिनम कलर वेरियंटमध्ये उपलब्ध करुन दिला गेला आहे. दरम्यान, कंपनीने अद्याप आतापर्यंत याचा भारतीय किंमतीसह उपलब्धतेसंबंधित कोणतीच माहिती दिलेली नाही.

मायक्रोसॉफ्ट सरफेस प्रो एक्स लॉन्चसह कंपनीने त्याच्या भारतातील उपलब्धतेबद्दल घोषणा केली आहे. भारतात या डिवाइसच्या 16GB+256GB LTE मॉडेलची किंमत 1,49,999 रुपये आहे. तर 16GB+512GB LTE वेरियंट 1,78,999 रुपयांच्या किंमतीसह लॉन्च केला आहे. हा प्लॅटिनम आणि ब्लॅक रंगात उपलब्ध असणार आहे. त्याचसोबत प्री-बुकिंगसाठी उपलब्ध करुन दिला असून त्याचा सेल 13 ऑक्टोंबर पासून सुरु होणार नाही.(Xiaomi ने भारतात लॉन्च केला वॉइस कंट्रोल करणारा Mi Smart LED Bulb)

Microsoft Surface Pro X मध्ये 2880x1920 पिक्सलच्या स्क्रिन रेजोल्यूशनसह 13.0 इंचाचा डिस्प्ले दिला गेला आहे. तसेच Microsoft SQ 2 प्रोसेसरवर उतरवण्यात आला असून Adreno 690 जीपीयू लैस आहे. यामध्ये कनेक्टिव्हिटीसाठी वायफाय 5, ब्लुटूथ 5.0, Qualcomm Snapdragon X24 LTE मॉडम, nanoSIM आणि eSIM सपोर्ट सारखे फिचर्स देण्यात आले आहेत. या व्यतिरिक्त नव्या Surface Pro X मध्ये युजर्सला accelerometer, gyroscope, magnetometer आणि ambient light सेंसर्स मिळणार आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement