FM Nirmala Sitharaman: भारताचे 5G इंटरनेट हे स्वदेशी 5G इंटरनेट, अर्थमंत्री निर्मला सितारमण यांचा थेट अमेरीकेत स्वदेशीचा नारा

एवढचं नाही तर इतर देशांना देखील भारत 5G प्रदान करू शकतो. अमेरीकेतील जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठातील कार्यक्रमा दरम्यान निर्मला सितारमण यांनी माहिती दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते नुकताचं इंडिया मोबाईल काँग्रेस कार्यक्रमात (India Mobile Congress - IMC 2022) 5G इंटरनेट सेवेचा शुभारंभ करण्यात आला. 5G इंटरनेट सेवेमुळे भारताला मोठा फायदा होणार आहे. भारतामध्ये रिलायन्स जिओ (Reliance Jio) आणि एअरटेल (Airtel) यासारख्या टेलिकॉम कंपन्या 5G इंटरनेट सेवा सज्ज आहेत. सुरुवातीला भारतामधील प्रमुख 13 शहरांमध्ये 5G सेवा सुरु होणार आहे. यांत राज्यातील दोन प्रमुख शहर म्हणजेच मुंबई (Mumbai) आणि पुणे (Pune) या दोन शहरांचा समावेश आहे. भारतात 5G इंटरनेट सेवेचा शुभारंभ होताचं नागरिकांमध्ये 5G इंटरनेट (Internet) सेवा बाबत मोठं कुतुहूल बघायला मिळत आहे. तरी देशाच्या अर्थमंत्री निर्मला सितारामण (FM Nirmla Sitharaman) यांनी थेट अमेरीकेत जावून भारताच्या 5G इंटरनेट (Internet) बाबत स्वदेशीचा नारा दिला आहे.

 

भारताचे 5G इंटरनेट हे स्वदेशी 5G इंटरनेट आहे . कोरिया (Korea) सारख्या देशातून काही भाग आयात (Import) केल्या जावू शकते परंतु जागातील इतर कुठल्याही देशाच्या सहकार्याशिवाय भारताने स्वतची 5G इंटरनेट (5G Internet) सेवा सुरु केली आहे. एवढचं नाही तर इतर देशांना देखील भारत 5G प्रदान करू शकतो. अमेरीकेतील जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठातील (John Hopkins University) कार्यक्रमा दरम्यान निर्मला सितारमण यांनी माहिती दिली आहे. (हे ही वाचा:- Digital Payments: UPI QR Codes लवकरच युरोपमध्येही होणार कार्यरत, NPCI चा वर्ल्डलाइनशी करार केला)

 

निर्मला सितारमण म्हणाल्या तंत्रज्ञानाच्या वापराने भारतात सुशासन साधले जात आहे आणि एक विशिष्ट परिवर्तन घडले आहे. गेल्या दोन वर्षांत लोकांच्या स्वीकाराची आणि अनुकूलनाची पातळी अविश्वसनीय आहे. भारतात आता पेमेंट, आरोग्य, शिक्षण अशा विविध बाबींमध्ये तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. लॉकडाऊन दरम्यान सरकारसह नागरिकांना देखील इंटरनेट, तंत्रज्ञान, डिजीटलायजेशन अशा विविध बाबी अत्यंत उपयुक्त ठरल्या असं निर्मला सितारमण यांनी सांगितलं आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif