गुगलचे खास डुगल (Photo Credit: Google)

Arecibo Message: आजच्या दिवशी मानवाने पृथ्वीबाहेर पहिला रेडिओ मेसेज पाठवला होता. वैज्ञानिकांच्या एक समुह Puerto Rico जंगलातील अरसिबो ऑब्जर्वेटरी (Arecibo Observatory) येथे एकत्र जमला आणि पहिल्यांदा पृथ्वी बाहेर रेडिओ मेसेज पाठवण्यात आला. 3 मिनिटांच्या या रेडिओ मेसेजमध्ये 1,679 बायनरी डिजिट्स होते. ज्यात 23 कॉमल आणि 73 ओळी होत्या. नंबरच्या या सिरीजचे लक्ष्य पृथ्वीपासून M-13, 25,000 प्रकाशवर्ष दूर स्थित असलेला तारकांचा समूह होता. हे ब्रॉडकास्ट खूप शक्तीशाली होते. कारण यात 305 मीटर एंटिनाला जोडणाऱ्या अरसीबोचे मेगावॉट ट्रान्समीटरचा उपयोग करण्यात आला होता.

अरसीबोद्वारा अलिकडेच अपग्रेड करण्यात आलेल्या रेडिओ टेलिस्कोपच्या क्षमता प्रदर्शित करणे हा या ऐतिहासिक ट्रान्समिशनचा मुख्य उद्देश होता.

गुगलने दिलेल्या माहितीनुसार, पाठवलेला हा अरसीबो मेसेज आपल्या लक्ष्यापर्यंत पोहचायला सुमारे 25 हजार वर्षांचा कालवधी लागणार आहे. स्वाभाविकच मानवला त्यासाठी खूप वेळ वाट पाहावी लागेल. कारण या प्रक्रीयेला साधारण किती वेळ लागेल याबद्दल काही माहिती नव्हती. अजूनपर्यंत हा अरसीबो मेसेज फक्त 259 ट्रिलियन माइल (259 trillion miles) पर्यंत पोहचला आहे. याचाच अर्थ पाठवण्यात आलेला हा मेसेज पुन्हा ऐकण्यासाठी मानव अजूनही वाट पाहत आहे.