
सोशल नेटवर्किंग साईट फेसबुक (Facebook) पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. युनायटेड किंगडमच्या (UK) Competition and Markets Authority (CMA) ने फेसबुकला सुमारे 50 दशलक्ष डॉलर्सचा दंड ठोठावला आहे. कंपनीने Giphy च्या अधिग्रहणाशी संबंधित माहिती जाणूनबुजून लपवली असल्याचे नियामकाला तपासात आढळून आल्यानंतर साइटकडून दंड आकारण्यात येत आहे. यूकेच्या CMA ने फेसबुकवर अशी कारवाई करण्याची ही पहिलीच वेळ आहे. प्राधिकरणाच्या वतीने असे म्हटले गेले आहे की, फेसबुकने आवश्यक असलेली माहिती शेअर करण्यास जाणीवपूर्वक नकार दिला.
सीएमएने यावर्षी फेसबुकच्या 400 दशलक्ष डॉलर्सच्या संपादनाबाबत चौकशी सुरू केली होती. सीएमएने म्हटले की कोणतीही कंपनी कायद्यापेक्षा मोठी असू शकत नाही. सीएमएने आपल्या तपास अहवालात म्हटले आहे की, माहिती देण्यास नकार देणे हे सिद्ध करते की, कंपनी Initial Enforcement Order (IEO) साठी बांधील होती.
The UK fines Facebook over £50 million for information breach, reports AFP pic.twitter.com/gK4anUQFhK
— ANI (@ANI) October 20, 2021
सीएमएचे संचालक जोएल बामफोर्ड म्हणाले, ‘आम्ही फेसबुकला इशारा दिला आहे की आम्हाला महत्त्वाची माहिती देण्यास नकार देणे हे आदेशाचे उल्लंघन मानले जाते.’ दोन वेगवेगळ्या न्यायालयांमध्ये अपील फेटाळल्यानंतरही फेसबुक कायदेशीर जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष करत आहे.
दरम्यान, रिपोर्टनुसार, फेसबुक त्याच्या रि-ब्रँडिंगची तयारी करत आहे. फेसबुकच्या नवीन नावाची घोषणाही पुढील आठवड्यात होऊ शकते. फेसबुकचे सीईओ मार्क झुकेरबर्ग 28 ऑक्टोबरला होणाऱ्या कार्यक्रमात कंपनीच्या नवीन नावाची घोषणा करू शकतात. फेसबुक अॅप व्यतिरिक्त, कंपनी इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅप, Oculus साठी देखील नवीन नावे जाहीर करू शकते. मात्र, फेसबुकने याबाबत अद्याप कोणतीही माहिती शेअर केलेली नाही.