असूस (Asus) कंपनीने त्यांच्या फ्लॅगशिप लॅपटॉपमधील Asus Zenbook Pro Duo भारतात नुकतान लॉन्च केला आहे. या ZenBook Pro Duo (UX581) दमदार लॅपटॉपची किंमत 2,09,990 रुपये आणि ZenBook Duo (UX481) यासाठी ग्राहकांना 89,990 रुपये मोजावे लागणार आहेत.Asus ZenBook Pro Duo ला मार्केटमध्ये फुल-लेंथ Asus स्क्रिनपॅड प्लससोबत लॉन्च केला आहे. जो 4K UHD OLED च्या डिस्प्लेवर काम करणार आहे. यापेक्षा अधिक Zenbook Duo मध्ये 1920p ASUSScreenPad Plus दिला आहे. हा 1080p FHD LCD डिस्प्लेवर काम करु शकणार आहे.
झेनबुक प्रो डुओमध्ये 4K UHD NanoEdge OLED HDR डिस्प्ले देण्यात आला असून त्याचे डिझाइन फ्रेमलेस आहे. तसेच लॅपटॉप अल्ट्रा-स्लिम ही आहे. दुसऱ्या बाजूला झेनबुक डुओ मध्ये 1080p full HD NanoEdge display, 4-साइड फ्रेमलेस डिजाइन दिली आहे. दोन्ही लॅपटॉपसाठी दुसरी स्क्रिन कीबोर्डच्या येथे देण्यात आली आहे.(जगातील दुसऱ्या क्रमांकावर भारतात सर्वाधिक इंटरनेट युजर्सची संख्या, रिपोर्टमधून उघड)
This multitasking beast is getting a lot of admirers today. But we're waiting for you. Check out the Zenbook Pro Duo now - https://t.co/M737YLrhBU. #ASUS #ZenbookProDuo #Intel10Gen #ASUSIndia #Intel #LaptopOfTomorrow pic.twitter.com/5kVcfug2pW
— ASUS India (@ASUSIndia) October 17, 2019
तसेच कंपनीने लॅपटॉप व्यतिरिक्त ZenBook लाइन-अपला इंटेल 10th जनरेशन कोर प्रोसेसर दिला आहे. ZenBook 13 (UX334), ZenBook 14 (UX434) आणि ZenBook 15 (UX534) यांची किंमत 84 हजार ते 1 लाख रुपयापर्यंत आहे. तसेच Asus ने 54,990 रुपयात VivoBook S431 आणि 69,990 रुपयात VivoBook S532 सुद्धा लॉन्च केला आहे.