Amazon Pharmacy: अ‍ॅमेझॉनचा आता ऑनलाइन औषध क्षेत्रात प्रवेश; बेंगळूरूमध्ये सेवा सुरु, घरपोच होणार Medicine Delivery
Amazon Pharmacy Launched in India (Photo Credits: Twitter)

ई-कॉमर्स क्षेत्रातील एक प्रमुख कंपनी अ‍ॅमेझॉनने (Amazon) आता फार्मसीच्या (Pharmacy) क्षेत्रामध्ये प्रवेश केला आहे. अ‍ॅमेझॉन आता ऑनलाइन औषध विभागात आपला पाय रोवण्याचा प्रयत्न करणार आहे. याद्वारे अ‍ॅमेझॉनने या क्षेत्रामध्ये आधीपासून लोकप्रिय असणाऱ्या NetMeds, 1mg, PharmEasy आणि Medlife अशा कंपन्यांना आव्हान दिले आहे. अ‍ॅमेझॉन फार्मसीमध्ये तुम्हाला घरपोच मेडिकल आणि उपकरणे, हेल्थकेअर पॅकेज, प्रिस्क्रिप्शन मेडिसीन आणि हेल्थकेअर डिव्हाइसेस उपलब्ध होतील. ही सेवा सध्या बेंगळुरूमध्ये उपलब्ध आहे.

याबाबत कंपनीने म्हटले आहे, ‘ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्याच्या आमच्या बांधिलकीचा एक भाग म्हणून, आम्ही बेंगळुरूमध्ये अ‍ॅमेझॉन फार्मसी सुरू करीत आहोत. ग्राहकांना प्रमाणित विक्रेत्यांकडून जास्तीची औषधे, मूलभूत आरोग्य उपकरणे आणि आयुर्वेद औषधे, व्यतिरिक्त डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधे यांचा पुरवठा केला जाईल. ही सेवा सध्याच्या काळाला अनुसरण अशी आहे, कारण यामुळे घरी सुरक्षित राहून ग्राहकांना त्यांच्या गरजा भागविण्यास मदत होईल.’

Entrackr च्या सूत्रांनुसार, ही सेवा हावडा आणि पश्चिम बंगालमधील काही निवडक शहरांमध्येही उपलब्ध आहे आणि लवकरच देशभरात या कार्याचा विस्तार होण्याची शक्यता आहे. कंपनीने मे महिन्यात ऑनलाइन फूड ऑर्डरिंग विभागामध्ये प्रवेश केला, परंतु इतर शहरांपर्यंत त्याचे प्रमाण अजूनतरी वाढले नाही. बंगळुरुमध्ये ही ही सेवा मर्यादित प्रमाणात कार्यरत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. सध्या कोरोना व्हायरस साथीच्या काळात आरोग्य उपचार आणि औषधांच्या मागण्या फार वाढल्या आहेत. अशात लोक जास्तीत जास्त घरात राहण्यास प्राधान्य देत असल्याने ऑनलाईन गोष्टींना सुगीचे दिवस आले आहेत. आता काळाची गरज ओळखून अ‍ॅमेझॉने ऑनलाइन औषध विभागात प्रवेश केला आहे. (हेही वाचा: महाराष्ट्रातील खासगी लॅबमध्ये COVID19 च्या चाचणीसाठी नागरिकांना 300 रुपये कमी मोजावे लागणार)

दरम्यान, मुकेश अंबानी यांची रिलायन्स इंडस्ट्रीज चेन्नईतील नेटमेड्सला 120 दशलक्ष डॉलर्समध्ये खरेदी करणार आहे. दुसरीकडे इकॉनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार, PharmEasy आणि Medlife संभाव्य विलीनीकरणाबाबत चर्चा करीत आहेत. जिथे फार्मएसी आपल्या 120-150 दशलक्ष डॉलर्स मिळवू शकेल. सोबतच अधिग्रहणासाठी 1mg देखील फार्मएसीशी चर्चा करत असल्याची बातमी आहे.