Jio च्या परिवारात सामील झाले 94 लाख ग्राहक, तर करोडो ग्राहकांनी फिरवली Airtel, Vodafone, Ideaकडे पाठ
Reliance Jio | (File Photo)

आपल्या धमाकेदार स्कीम्सने ग्राहकांना आपल्याकडे वळविण्यात रिलायन्स जिओ(Jio) कंपनी अखेर यशस्वी झाली आहे. त्याच्या पसंतीची पावती मिळालीय मार्चमधील ग्राहकांच्या आकडेवारीवरुन. जिओ ने इतर टेलिकॉम कंपन्यांना मागे टाकत मार्चमध्ये 94 लाख ग्राहक जोडले आहेत. तर दुसरीकडे जिओ च्या प्रतिस्पर्धी कंपन्या एअरटेल(Airtel), वोडाफोन(Vodafone) आणि आयडियाच्या (Idea) जोडलेल्या ग्राहकांनी पाठ फिरविली आहे. ह्यात भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या(Telecom Regulatory Authority of India) आकड्यांनुसार, वोडाफोन आणि आयडियाचे 1.45 करोड ग्राहकांची संख्या कमी झाली आहे. तर एअरटेलचे 1.51 करोड ग्राहक कमी झाले.

TRAI च्या आकड्यांनुसार, 31 मार्च 2019 पर्यंत देशात एकूण मोबाईल ग्राहकांची संख्या 116.18 करोड होती, जी त्याच्या आधीच्या महिन्यातील संख्येपेक्षा 2.18 करोडने कमी आहे. ह्याचाच अर्थ मार्च अखेरीस मोबाईल ग्राहकांची संख्या 91.86 वरुन 90.11 वर आली.

TRAI च्या सर्वेक्षणानुसार, मार्च 2019 च्या अखेरीस वोडाफोन, आयडिया च्या ग्राहकांची संख्या 39.48 करोड होती, तर एअरटेल ग्राहकांची संख्या 32.51 करोड इतकी होती. त्यांच्या तुलनेत ह्या कंपन्यांचा प्रतिस्पर्धी जिओच्या ग्राहकांची संख्या 30.67 करोड होती.

Jio Prime Membership आता पूर्णतः मोफत, कंपनीने घेतला 'हा' मोठा निर्णय; जाणून घ्या सविस्तर

जिओच्या ग्राहकांच्या संख्येतील ही लक्षणीय वाढ लक्षात घेता वोडाफोन, एअरटेल आणि आयडियाला ह्याचा चांगलाच फटका बसलाय.