2G, 3G वापरून कंटाळा आला 4G झाले जुने; आता 5G येताच गतीमान होईल जगणे

ज्यामुळे आपल्या घरातील फ्रिज, टीव्ही, वॉशिंगमशीन पासून सुरक्षा यंत्रणेपर्यंत सर्व डिव्हायसेस आपल्या मोबाईल फोनशी जोडलेली असतील. स्मार्ट सिटी आणि चालकविरहीत कार (ड्रायव्हरलेस कार) हे भारतातील वास्तव बनेन.

5G Mobile Network | (Photo courtesy: archived, edited, representative image)

तुमच्या स्मार्टफोन किंवा लॅपटॉपसाठी 4G नेटवर्क वापरूनही इंटरनेट स्लो चालत असेल तर, काळजी करु नका. लवकरच या त्रासापासून तुमची सुटका होणार आहे. लवकच 3G, 4G कालबाह्य होऊन त्याची जागा 5G घेणार आहे. होय, 5G. त्यामुळे तुमचे इंटरनेट स्पीड कित्येक पटीने अधिक वेगवान होणार आहे. 5G म्हणजे मोबाईल नेटवर्कची (5G Mobile Network) पाचवी पीढी. 5G मुळे केवळ इंटरनेट स्पीडच अपग्रेड होणार नाही. तर, सोबतच नव्या टेक्नॉलजीचाही प्रारंभ होणार आहे. 5G युगात लाखो डिव्हायसेस एकत्र येतील आणि एकमोकांसोबत व्यवहारही करतील. ज्यामुळे आपल्या घरातील फ्रिज, टीव्ही, वॉशिंगमशीन पासून सुरक्षा यंत्रणेपर्यंत सर्व डिव्हायसेस आपल्या मोबाईल फोनशी जोडलेली असतील. स्मार्ट सिटी आणि चालकविरहीत कार (ड्रायव्हरलेस कार) हे भारतातील वास्तव बनेन. अवघ्या भारतीयांच्या नजरा लागलेले हे 5G नेटवर्क जनरेशन 2020मध्ये भारतात लॉन्च होईल. हे जनरेशन लॉन्च होताच कोट्यवधी भारतीयांच्या दैनंदिन आयुष्यावर त्याचा परिणाम होणार आहे.

काय आहे 5G ?

गेल्या कित्येक वर्षांपासून मोबाईल इंडस्ट्री, मोबाईल नेटवर्कला एक नवे 'जनरेशन' किंवा 'G 'मध्ये अपग्रेड आणि रीबिल्ड करते आहे. 5G सध्यास्थितीत एलटीई, 4G नंतर येणारे बिल्ड आहे. ज्यात प्रामुख्याने 3 अपग्रेड्स असतील.

दरम्यान, 5G नेटवर्क आल्यानंतर टेक विश्वात पुन्हा एकदा नवी क्रांती होईल. जी 10 वर्षांपूर्वी 4जीने आणली होती. 4जी नेटवर्क येण्यापूर्वी स्ट्रीमिंग, न्यूजिक आणि व्हिडिओ, नव्हिगेशन अॅप्सचा वापर तसेच डिजिटल ट्रांजेक्शन करणे सोपे नव्हते. पण, 4G लॉन्च झाले आणि सगळे चित्रच पालटले. लोक वेगाने वेगाशी स्पर्धा करु लागले. जगभरातील नागरिकांच्या संवाद आणि आर्थित आणि विविध पातळीवरची देवाणघेवाण वाढली.