World Cup 2019: Team India च्या ड्रेसिंगरूममध्ये रिषभ पंत ला प्रवेश बंदी, जाणून घ्या का
(Photo: Getty Images)

भारताचा युवा फलंदाज रिषभ पंत (Rishabh Pant) संघाच्या पाकिस्तान (Pakistan) विरुद्धच्या सामन्याआधी इंग्लंड (England) ला पोहचेल असे एका बीसीसीआय (BCCI) अधिकाऱ्याने सांगितले. मात्र पंत जरी इंग्लंडला पोहोचला तरी त्याला भारतीय संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये प्रवेश मिळणार नाही. त्याचे कारण असे कि, आयसीसी (ICC) च्या भ्रष्टाचार विरोधी नियमांनुसार फक्त संघात निवड झालेल्या खेळाडूंनाच संघासोबत प्रवास करता येतो आणि ड्रेसिंग रुममध्ये जाता येतं असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. (ICC World Cup 2019: 'गब्बर' कधी खेळणार? विराट कोहली ने दिली शिखर धवन च्या दुखापतीवर Update)

त्यामुळे पंत ला खलील अहमद (Khaleel Ahmad) प्रमाणेच दुसऱ्या वाहनाने प्रवास करावा लागेल. याची माहिती बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्यांनी पीटीआयला (PTI) दिली. जोवर संघ व्यवस्थापन धावांचा उपलब्धते बाबत अंतिम निर्णय घेत नाही तोवर पंतला संघात पक्क स्थान दिले जाणार नाही.

ऑस्ट्रेलिया (Australia) विरुद्धच्या सामन्यात भारताचा सलामीवीर शिखर धवन (Shikhar Dhawan) च्या अंगठ्याला दुखापत झाली. अद्याप तो नक्की किती सामने खेळू शकणार नाही हे समजले आणि आता त्याच्या जागी राखीव खेळाडू म्हणून पंतला इंग्लंडमध्ये बोलावण्यात आलं आहे. पूर्वी भारताच्या वर्ल्ड कप संघात पंतला स्थान मिळू शकलं नव्हतं.