'CWC 2019 एक ओलसर स्क्विब बनत आहे', World Cup चे तीन सामने पाण्यात गेल्याने शशी थरूर नाराज
Shashi Tharoor (Photo Credits: Shashi Tharoor/ Facebook)

प्रत्येक वर्ल्ड कप चाहत्या प्रमाणेच काँग्रेस (Congress) नेते शशी थरूर (Shahi Tharoor) हि इंग्लंड (England) मध्ये सतत होणाऱ्या मुसळधार पावसामुळे निराश झाले आहे. आत्तापर्यंत पावसामुळे विश्वकप चे दोन श्री लांका (Sri Lanka) चे सामने, पाकिस्तान (Pakistan) आणि बांगलादेश (Bangladesh) विरुद्ध आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) विरुद्ध वेस्टइंडिज (West Indies), असे आत्तापर्यंत तीन सामने पावसामुळे धुउन निघाले आहे. थरूर यांनी ट्विटरद्वारे आपली निराशा व्यक्त केली. थरूर लिहितात, 'जगभरात हवामान बदलाच्या समस्येचे निराकरण होईपर्यंत किंवा इंग्लंडच्या मेरिलबोन क्रिकेट क्लब (एमसीसी) ने स्टेडियमवर छप्पर घाले तोवर क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यापासून इंग्लंडला प्रतिबंधित केले जावे.' (IND vs NZ, ICC Cricket World Cup 2019: भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यवर पावसाचे सावट)

दक्षिण आफ्रिका आणि वेस्टइंडीज यांच्यातील सामना खराब हवामानामुळे सोमवारी बंद झाल्यानंतर मंगळवारी ब्रिस्टलमधील श्रीलंका-बांगलादेशमध्ये एक चेंडूचा खेळ झाला नाही.

दुसरीकडे, भारत आणि न्यूझीलंडच्या सामन्यावर देखील पावसाचे सावंत आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम येथे खेळाला जाईल. मात्र, गेले दोन दिवस नॉटिंगहॅम ला जोरदार पाऊस सुरु आहे.