रोहित शर्मा (Photo Credit: PTI)

टीम इंडियाचा (Team India) कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 15 वर्षे पूर्ण केली आहेत. रोहित शर्माने 23 जून 2007 रोजी पहिल्यांदा टीम इंडियाची जर्सी घातली होती. रोहित शर्माने टीम इंडियासोबतच्या 15 वर्षांच्या प्रवासाचे वर्णन केले आहे. यावेळी रोहित शर्माने त्या सर्व लोकांचे आभार मानले ज्यांनी हा खडतर प्रवास ठरवण्यात त्याला साथ दिली. एक अतिशय खास पोस्ट लिहून रोहित शर्मा म्हणाला, आज मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 15 वर्षे पूर्ण केली आहेत. 15 वर्षांपूर्वी याच दिवशी मी भारतासाठी पदार्पण केले होते. किती छान प्रवास झाला आहे. एक असा प्रवास जो मी माझ्या आयुष्यभर लक्षात ठेवू शकतो आणि आनंदी राहू शकतो.

रोहित शर्माने पुढे लिहिले की, आज मी त्या सर्व लोकांचे आभार मानू इच्छितो जे या प्रवासात माझ्यासोबत आहेत. मी त्या लोकांचा सदैव ऋणी राहीन ज्यांनी मला आजचा खेळाडू बनण्यास मदत केली. रोहित शर्मा म्हणाला, क्रिकेटवर प्रेम करणाऱ्या चाहत्यांचे प्रेम आणि पाठिंबा आम्हाला संघाला पुढे नेण्यात मदत करतो. तुमच्यामुळेच आम्ही मोठ्या अडचणींवर मात करू शकलो आहोत.

रोहित शर्मा हा तिन्ही फॉरमॅटमध्ये विराट कोहलीनंतर टीम इंडियाचा सर्वोत्तम फलंदाज आहे. रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 15 हजारांहून अधिक धावा केल्या आहेत. इतकंच नाही तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये तीन द्विशतकं झळकावणारा रोहित शर्मा जगातील एकमेव खेळाडू आहे. रोहित शर्माच्या फलंदाजात खरा बदल सलामीवीर बनल्यानंतर आला आणि त्यानंतर त्याने मागे वळून पाहिलेच नाही.