Perfect 10! आसामच्या अर्पण दत्ता ने एका सामन्यात 10 विकेट घेत रचला नवीन इतिहास
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

पारीत सर्व 10 विकेट घेण्याची दुर्मिळ कामगिरी करणे हे कोणत्याही गोलंदाजांच स्वप्न असतं. काहींना हे करण्यात यश मिळते तर काही फक्त स्वप्नच पाहत राहतात. पण आसाम (Assam) च्या शिवसगर जिल्ह्यातील २५ वार्षिकअर्पण दत्ता (Arpan Dutta) ने 13 जून रोजी प्रतिष्ठित नूरुद्दीन अहमद ट्रॉफी (Nuruddin Ahmed Trophy) च्या सीनियर इंटर-स्टेट क्रिकेट टूर्नामेंटच्या एका डावात 10 विकेट्स घेऊन इतिहासात आपले नाव नोंदवले आहे. अर्पण ने शिवासगर विरुद्ध चराईदेव च्या सामन्यादरम्यान या विक्रमांची नोंद केली.

अर्पण, डावखुरा ऑर्थोडॉक्स स्पिनर, ने 19 ओव्हर मध्ये 48 धावा देऊन 10 विकेट्स घेतल्या. अर्पणच्या या आश्चर्यजनक गोलंदाजी च्या जोरावर शिवसागर संघाने चराईदेव संघाला केवळ 121 धावांत रोखलं.

नूरुद्दीन अहमद ट्रॉफीच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ आहे की एक गोलंदाजाने एका डावात सर्व 10 बळी घेतले. अर्पण ला त्याच्या विध्वंसक बॉलिंगसाठी 'मॅन ऑफ दी मॅच' च्या पुरस्काराने गौरवण्यात आले.