COVID-19 प्रोटोकॉलचा भंग केल्याबद्दल पाकिस्तानच्या Raza Hasan याची घरी रवानगी, PCB कडून Quaid-e-Azam ट्रॉफी दरम्यान मोठी कारवाई
पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (Photo Credit: Twitter)

पाकिस्तानमधील स्थानिक क्रिकेट सामन्यादरम्यान पाकिस्तान क्रिकेट बोर्डने (Pakistan Cricket Board) गोलंदाजाविरुद्ध मोठी कारवाई केली असल्याची माहिती समोर आली आहे. COVID-19 प्रोटोकॉलचा भंग केल्याबद्दल पाकिस्तान आंतरराष्ट्रीय रझा हसनची (Raza Hasan) उर्वरित देशांतर्गत क्रिकेट हंगामातून घरी रवानगी करण्यात आली आहे. 28 वर्षीय फिरकी गोलंदाजाने उच्च कार्यक्षमता विभाग आणि “वैद्यकीय पथकाकडून पूर्व परवानगी न घेता स्थानिक हॉटेलमध्ये जैव-सुरक्षित परिसर सोडला,” पीसीबीने (PCB) सांगितले. कैद-ए-आजम ट्रॉफी (Quaid-e-Azam Trophy) स्पर्धेत हसन नॉर्दर्नच्या द्वितीय इलेव्हनचे प्रतिनिधित्व करीत होता. “हे खेदजनक आणि दुर्दैव आहे की कोविड-19 प्रोटोकॉलचा आदर व त्यांचे महत्त्व याविषयी अनेक शैक्षणिक कार्यक्रम घेऊनही, रझा हसनने बाबी आपल्या हातात घेण्याचा निर्णय घेतला आणि लाईन ओलांडून पुढे गेले,” बोर्डचे उच्च परफॉरमन्स संचालक नदीम खान यांनी सांगितले. (NZ vs WI 2020: न्यूझीलंडची पाकिस्तान संघाला चेतावणी, Quarantine नियम मोडल्यास घर परत पाठवू; शोएब अखेरने NZC ला सुनावलं)

खान म्हणाले की, हसनने “आपल्या बेजबाबदार कृतींवर आणि त्याच्या उल्लंघनामुळे त्याच्या आणि सर्वसाधारणपणे आणि पाकिस्तान क्रिकेटमधील विशेषत: इव्हेंटला झालेल्या संभाव्य नुकसानीवर विचार करायला हवा.” खान पुढे म्हणाले की, “त्याप्रमाणे, त्याला स्पर्धेतून काढून टाकण्यात आले आहे आणि उर्वरित हंगामात त्याला परवानगी दिली जाणार नाही.” 2012 मध्ये हसनने टी-20 विश्वचषक मॅचदरम्यान ऑस्ट्रेलियाची जोडी शेन वॉटसन आणि ग्लेन मॅक्सवेलला बाद करत प्रतिष्ठा मिळवली. मात्र, त्यानंतर त्याने केवळ 10 टी-20 आणि एक एकदिवसीय सामना खेळला. यानंतर 2015 मध्ये बंदी घातलेल्या पदार्थाचे सेवन केल्याबाद्दल त्याच्यावर दोन वर्षाची बंदी घालण्यात आली.

दुसरीकडे, न्यूझीलंड दौऱ्यावर असलेल्या पाकिस्तानी संघातील अनेक सदस्य कोरोना पॉसिटीव्ह असल्याने खळबळ उडाली त्यानंतर न्यूझीलंड बोर्डाने संघाला चेतावणी दिली आणि म्हटले की पुन्हा कोविड-19 प्रोटोकॉलचे उल्लंघन केले तर ते संपूर्ण टीमची मायदेशी रवानगी करतील. यामुळे प्रचंड वाद निर्माण झाला आणि, पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज 'रावळपिंडी एक्स्प्रेस' शोएब अख्तरने न्यूझीलंड क्रिकेट बोर्ड आणि पीसीबीच्या विमानांच्या व्यवस्थेवर आरोप केला.