Tokyo Olympics 2020: वेटलिफ्टिंगमध्ये 49 किलो वर्गात भारताच्या Mirabai Chanu हिने पटकावले रौप्यपदक, चीनची सुवर्ण कामगिरी

मीराबाई चानूने 49 किलो वजनी गटातील महिला वेटलिफ्टिंग स्पर्धेत देशासाठी पहिल्या सर्वात मोठ्या पदकाची कमाई केली आहे. मीराबाई चानूने स्नॅचमध्ये 87 किलो वजन उंचावले तर 115 किलो वजन भार देखील उचलला. यासह तिने एकूण 202 किलो वजन उचलले.

मीराबाई चानू (Photo Credit: PTI)

Tokyo Olympics 2020: साइखोम मीराबाई चानूने (Chanu Saikhom Mirabai) टोकियो ऑलिम्पिक (Olympics) 2020 मध्ये भारतासाठी (India) पहिले पदक जिंकले आहे. मीराबाई चानूने 49 किलो वजनी गटातील महिला वेटलिफ्टिंग स्पर्धेत देशासाठी पहिल्या सर्वात मोठ्या पदकाची कमाई केली आहे. मीराबाई चानूने स्नॅचमध्ये 87 किलो वजन उंचावले तर 115 किलो वजन भार देखील उचलला. यासह तिने एकूण 202 किलो वजन उचलले. मीराबाई चानूच्या या विजयाने भारताच्या पदकाचे खाते उघडले आहे. चानूपूर्वी सिडनी ऑलिम्पिक 2000 कर्नाम मल्लेश्वरीने भारोत्तोलनात भारताला कांस्यपदक दिले. कर्णम मल्लेश्वरीने त्यावेळी एकूण 240 किलो वजन उचलले होते. स्नॅच प्रकारात 110 किलो व क्लीन अँड जर्कीमध्ये 130 किलो वजन उचलून ऑलिम्पिक कांस्यपदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला ठरली. (Tokyo Olympics 2020 Medal Tally Updated: कोणत्या देशाने जिंकले किती सुवर्ण, रौप्य व कांस्यपदके, क्रमवारीसह संपूर्ण पॉईंट्स टेबल इथे पाहा)

दरम्यान मीराबाई चानूच्या ऐतिहासिक विजयावर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी ट्विट करून शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान मोदींनी लिहिले, “टोक्यो 2020 ची आणखी सुखी सुरुवात होऊच शकत नाही! मीराबाई चानू यांच्या जबरदस्त कामगिरीने भारत खूष आहे. वेटलिफ्टिंगमध्ये रौप्य पदक जिंकल्याबद्दल तिचे अभिनंदन. तिचे यश प्रत्येक भारतीयांना प्रेरित करते.” दुसरीकडे, 49 किलो महिलांच्या भारोत्तोलनामध्ये चीनच्या वेटलिफ्टरने सुवर्णपदक जिंकले. चिनी वेटलिफ्टरने स्नॅचमध्ये 94 किलो वजन उचलून नवीन ऑलिम्पिक रेकॉर्ड नोंदवला.

49 किलो वजनी गटात महिलांच्या वेटलिफ्टिंगची सुरुवात स्नॅच फेरीपासून झाली. यात मीराबाई चानूने तिच्या पहिल्या प्रयत्नात 81 किलो वजन उचलले. यानंतर, दुसऱ्या प्रयत्नात तिने 87 किलो वजन उचलले तथापि, तिचा तिसरा प्रयत्न अयशस्वी झाला. तिसऱ्या प्रयत्नात ती 89 किलो वजन वाढवण्यासाठी आली. जर तिने ते वजन उचलले असते तर स्नॅच फेरीत ती तिची वैयक्तिक सर्वोत्कृष्ट ठरली असती. पण, तिला हे करता आले नाही आणि स्नेच फेरीत तिचे सर्वाधिक वजन 87 किलो नोंदवले गेले. स्नॅच फेरीत मीराबाईने सर्व महिला वेटलिफ्टर्समध्ये दुसरे स्थान पटकावले. त्यानंतर मीराबाई चानूने 110 किलो वजन उचलून क्लीन अँड जर्कची सुरुवात केली. ती दुसर्‍या प्रयत्नात 115 किलो ग्राम वजन भार उचलला तर तिसऱ्या प्रयत्नात ती 117 किलो वजन उचलण्यात अपयशी ठरली.