लातूर येथील पी हरिकृष्ण गीनिज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये चमकला; टेबल टेनिस खेळात अभिमानास्पद कामगिरी
टेबल टेनिस | प्रतिनिधित्व प्रतिमा (Photo Credit: Getty)

महाराष्ट्रातील (Maharashtra) लातूर (Latur) येथील एका 14 वर्षाच्या मुलाने एका तासामध्ये टेबल टेनिस (Table Tennis) पॅडलचा वापर करून सर्वाधिक पर्यायी हिट्स विश्वविक्रमाची गिनीज वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस्मध्ये (Guinness World Record) नोंद केली. पी हरिकृष्ण असे या मुलाचे नाव आहे. त्यानेटेबल टेनिस पॅडलद्वारे सर्वाधिक पर्यायी हिट्सच्या विश्वविक्रमाची नोंद करण्यासाठी 9,512 हिट्स मारले. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड वेबसाइटनुसार यावर्षी 1 ऑक्टोबर रोजीपी हरिकृष्णाने मागील विक्रम हजारो हून अधिक पर्यायी हिटने जिंकत विक्रमाची नोंद केली. राजा नारायणलाल लाहोटी इंग्लिश स्कूलमध्येच्या इयत्ता 9वी मध्ये शिकत असलेल्या हरिकृष्णचा 20 डिसेंबर रोजी सत्कार करण्यात आला. पालक आणि शाळेने आपल्याला मदती व प्रेरणा दिली ज्यामुळे त्याने हे यश संपादन केले असे म्हणत या युवा मुलाने आभार मानले. (अहमदाबाद येथील 6 वर्षीय Arham Om Talsania ची मोठी कामगिरी; सर्वात लहान कॅम्प्युटर प्रोग्रामर म्हणून Guinness World Record मध्ये नोंद)

दरम्यान, यापूर्वी 2015 मध्ये लातूरच्या विराग मारे या क्रिकेटपटूने सर्वाधिक काळ नेट सेशन करत गिनीजच्या जागतिक विक्रम पुस्तकात आपले नाव नोंदवले होते. मारेने 50 तासांपेक्षा हुन अधिक काळ नेटमध्ये फलंदाजी केली आणि मागील 48 तासांचा विक्रम मोडला. लातूर मुलाने डेव्ह न्यूमन आणि रिचर्ड वेल्स या इंग्लिश जोडीचा विक्रम मोडला आणि तीन दिवस व दोन रात्र फलंदाजी केली. लातूरच्या मुलाने 22 डिसेंबर, 2015 रोजी फलंदाजीस सुरुवात केली होती जी 50 तास पूर्ण केल्यावर 26 डिसेंबर रोजी थांबली. या दरम्यान, त्याने 2,447 ओव्हरमध्ये 14,682 चेंडूंचा सामना केला. बुधवारी वगळता, अन्य दिवशी 25 मिनिटांचा ब्रेक घेण्यापूर्वी मारेने सलग 5 तास फलंदाजी केली. तत्पूर्वी, मारेने वयाच्या 16व्या वर्षी सचिन तेंडुलकरचे प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांचे अकादमीमध्ये प्रवेश मिळवला होता, परंतु फी भरण्यास असमर्थ असल्यामुळे त्याला माघार घ्यावी लागली.