राज्य सरकारकडून दरवर्षी दिल्या जाणाऱ्या, क्रीडा विश्वातील महत्वाच्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराची (Shiv Chhatrapati Rajya Krida Jeevan Gaurav Puraskar) घोषणा आज झाली आहे. पुणे येथील पंढरीनाथ तथा अण्णासाहेब तुकाराम पठारे (Pandharinath Pathare) यांना 2018-19चा शिवछत्रपती जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांतर्गत उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार (महिला क्रीडा मार्गदर्शक) आदि पुरस्कारांसाठी अर्ज करण्यासाठी 5 फेब्रुवारी ही मुदत देण्यात आली होती.
शिवछत्रपती पुरस्कारासाठी जीवन गौरव, मार्गदर्शन, संघटक, कार्यकर्ते, खेळाडू अशा पाच गटामध्ये तब्बल 289 अर्ज प्राप्त झाले होते. त्यातून 63 व्यक्तींची पुरस्कारासाठी निवड केली गेली. क्रीडामंत्री सुनील केदार यांनी याबाबत माहिती दिली.
22 फेब्रुवारीला गेट वे ऑफ इंडिया येथे, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान समारंभासह, खेलो इंडिया युथ गेम्स 2020 मधील पदक विजेत्या खेळाडूंचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सत्कार होणार आहे. क्रीडा क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या खेळाडू, संघटक आणि प्रशिक्षकांना दरवर्षी शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यंदा शिवछत्रपती पुरस्कारासाठी जीवनगौरव, मार्गदर्शक, खेळाडू, साहसी खेळ आणि दिव्यांग खेळाडू अशा एकूण पाच गटामध्ये एकूण 63 व्यक्तींची निवड केली गेली आहे.
जाहीर झालेले पुरस्कार -
शिवछत्रपती जीवनगौरव राज्य क्रीडा पुरस्कार - पंढरीनाथ उर्फ अण्णासाहेब पठारे -पुणे
उत्कृष्ट मार्गदर्शक - युवराज खटके (अॅथेलेटिक्स, सांगली), बाळासाहेब आवारे (कुस्ती, बीड - थेट पुरस्कार), नितीन खत्री (तायक्वांडो, पुणे), जगदीश नानजकर (खो-खो, पुणे), अनिल पोवार (पॅरा अॅथलेटीक्स, कोल्हापूर) (हेही वाचा: Kambala शर्यतीत आठवड्यातच मोडला श्रीनिवास गौडा यांचा रेकॉर्ड, निशांत शेट्टी ने 9.51 सेकंदात गाठले 100 मीटर अंतर (Video)
इतर पुरस्कार -
#शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त मान्यवरांची यादी pic.twitter.com/amzdlGtz9c
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) February 18, 2020
दरम्यान, पंढरीनाथ उर्फ अण्णासाहेब पठारे यांना कुस्तीचे आश्रयदाते म्हणून ओळखले जाते. आज वर त्यांनी अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मल्ल आपल्या हाताखाली घडवले आहेत. यंदा त्यांना जीवनगौरव राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर झाल्याने कुस्तीविश्वात आनंदाचे वातावरण आहे. यावर्षीच्या पुरस्कारांमध्ये कार्यकर्ते व संघटनाचा समावेश नाही. त्यांच्यासाठी वेगळी योजना असल्याची माहिती क्रीडामंत्र्यांनी दिली.