Coronavirus: कोविड-19 पॉसिटीव्ह कुकचा SAI बेंगळुरू येथे मृत्यू, स्वयंपाकी खेळाडूंच्या संपर्कात आला नसल्याचे हॉकी इंडियाने दिले स्पष्टीकरण
प्रतीकात्मक फोटो (Photo Credit: Getty)

स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाच्या (SAI) बेंगळुरू येथील केंद्रात काम करणाऱ्या कोरोना व्हायरस (Coronavirus) पॉसिटीव्ह कुकचा मृत्यू झाला. मात्र, येथे राहत असलेल्या पुरुष आणि महिला हॉकी टीमला (Hockey Team) स्थलांतरित करण्याची शक्यता हॉकी इंडियाने (Hockey India) फेटाळून लावली. ते म्हणाले की खेळाडू त्या स्वयंपाकीच्या संपर्कात नव्हते. 25 मार्चपासून सुरू झालेल्या लॉकडाउनमुळे अनेक आघाडीचे भारतीय खेळाडू येथे राहत होते. यामध्ये भारताचे पुरुष आणि महिला ज्येष्ठ हॉकीपटू आणि अ‍ॅथलेटिक्स पथकाचे 10 सदस्य समाविष्ट आहेत जे सर्व पुढे ढकलले गेलेले टोकियो ऑलिम्पिकसाठी प्रशिक्षण घेत आहेत. या घटनेमुळे आता खेळाडूंना प्रोटोकॉलनुसार त्यांच्या खोल्यांमध्येच मर्यादीत राहावे लागेल आणि केंद्रात स्वच्छता केली जाईल. हॉकी इंडियाच्या सीईओ एलिना नोर्मन यांनी पीटीआयला सांगितले की, "देशातील सर्वात चांगली सुविधा असल्याने संघांना बेंगळूरुमधून काढून टाकण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. जरी आम्ही असे करण्याचा विचार केला असला तरी लॉकडाउनमुळे हे प्रत्यक्ष व्यवहारात अशक्य होईल." (Coronavirus: आरोग्य सेतू अ‍ॅप डाऊनलोड करा! महामारीनंतर हॉकी इंडियाचा खेळाडूंसाठी नवीन नियम अनिवार्य)

दुसऱ्या जेष्ठ अधिकाऱ्याने असेही सांगितले की, स्वयंपाकीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आणि नंतर तो कोरोना व्हायरस पॉझिटिव्ह असल्याचे आढळले. मृत व्यक्तीला खेळाडूंच्या निवासस्थानावर जाऊ दिले जात नाही म्हणून घाबरण्याचे काहीच कारण नाही, असे या अधिकाऱ्याने सांगितले. अधिकाऱ्याने सांगितले की, 10 मार्चपासून कूक फाटकाच्या आसपासच्या क्षेत्राच्या पलीकडे गेला नव्हता. दरम्यान, अधिकाऱ्याने सांगितले की या स्वच्छतेच्या प्रक्रियेस पाच दिवस लागू शकतात.

क्रीडा मंत्रालय आणि साई ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या किंवा पात्रतेसाठी मैदानात उतरणाऱ्या खेळाडूंसाठी बंगळुरू आणि पटियाला येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट (एनआयएस) मध्ये पुन्हा खेळण्यासाठी बाह्य प्रशिक्षण देण्याची योजना आखत असताना ही घटना घडली. मात्र, स्वयंपाकी एका बैठकीला आला होता, ज्यात सुमारे 30 लोक उपस्थित होते असा अहवाल साईने फेटाळून लावला. “या बैठकीला जे कोणी उपस्थित होते, मृत व्यक्तीसह तेथे फक्त पाच लोक होते. तर इतर चौघांना क्वारंटाइन ठेवण्यात आले आहे. तो प्रशासकीय ब्लॉकमध्ये होता आणि खेळाडू जेथे राहतात त्या निवासी ब्लॉकपासून ते वेगळे होते. त्यांना त्यांच्या खोल्यांमधून अजिबात बाहेर दिले जात नाही. ते बर्‍याचदा भेटल्यासारखे नाही, असे एका SAI अधिका-यांनी सांगितले.