Australian Open 2019: स्पेनचा स्टार खेळाडू राफेल नदालने (Rafael Nadal) ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेमध्ये (Australian Open) पुन्हा एकदा दिमाखदार कामगिरी केली आहे. नदालने 5 व्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत नदालने स्टेफानोस स्तिस्तिपास (Stefanos Tsitsipas) या खेळाडूवर 6-2, 6-4, 6-0 अशा सरळ सेट्मध्ये विजय मिळवला आहे. नदालच्या या विजयामुळे तो फायनलमध्ये पोहचण्याच्या या 25 व्या वेळी तो ग्रॅंड स्लॅमच्या फायनल्समध्ये पोहचला आहे. 32 वर्षीय स्पॅनिश खेळाडूने यंदा फायनल्समध्ये पोहचताना एकही खेळ गमावला नाही.
World No. 2 Rafael Nadal will play in his fifth #AusOpen final after defeating Stefanos Tsitsipas in straight sets. https://t.co/qRZMSMyUbe
— Twitter Moments (@TwitterMoments) January 24, 2019
17 ग्रॅन्ड स्लॅम जिंकणार्या नदालने यापूर्वी चार वेळेस ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम सामन्यापर्यंत पोहचण्याची किमया केली आहे. त्यापैकी 2009 साली तो जिंकला होता. तर नदाल ऑस्ट्रेलियन ओपनच्या पुरूष सिंगल्सच्या फायनल्समध्ये 2017 साली पोहचला होता. मात्र त्यावेळेस रोजर फेडररने त्याच्यावर मात केली होती. यंदा दहा वर्षांनंतर ऑस्ट्रेलियन ओपन जिंकण्याची संधी नदालकडे आहे.