मुंबई इंडियन्सची मालक नीता अंबानी यांचा iSportconnect क्रीडा क्षेत्रातील Top 10 प्रभावशाली महिलांमध्ये समावेश, पाहा संपूर्ण लिस्ट
नीता अंबानी (Photo Credit: IANS)

मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) फ्रँचायझीच्या मालक असलेल्या नीता अंबानी (Nita Ambani) यांना 2020 च्या क्रीडा क्षेत्रातील 10 सर्वात प्रभावशाली महिलांच्या यादीत स्थान देण्यात आले आहे. श्रीमती अंबानीसह या यादीत सेरेना विल्यम्स (Serena Williams) आणि जिम्नॅस्ट सिमोन बाईल्स (Simone Biles) यांचाही समावेश पहिल्या 10 प्रभावशाली महिलांमध्ये समावेश आहे. नीता, या श्रीमंत भारतीय मुकेश अंबानी यांच्या पत्नी असून जून 2014 पासून रिलायन्स इंडस्ट्रीज (Reliance Industries) बोर्डच्या सदस्या आहेत. स्पोर्ट्स बिझिनेस नेटवर्क, आयसपोर्टकने 2020 च्या 'प्रभावशाली क्रीडा क्षेत्रातील महिला' यादी जाहीर केली. अंबानी यांनी मुंबई इंडियन्सचा फ्रॅन्चायझीला आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी फ्रॅन्चायझी बनवले आहे आणि देशातील विविध खेळांसह  अनेक क्रीडा प्रकल्पांमध्ये त्यांनी भाग घेतला आहे. (मुकेश अंबानी यांनी Asia's Richest Man यादीतील अव्वल स्थान गमावलं; Jack Ma आता पहिल्या स्थानी)

"जगातील एक महान खेळाडू आणि खेळातील महिलांचा सतत वाढणारा आवाज" असे वर्णन केलेल्या अमेरीकेची जिम्नॅस्ट सिमोन बाईल्स आणि फुटबॉलर मेगन रॅपिनो "जिला तिच्या मनातलं आणि सामाजिक विषयांवर बोलण्यास कधीही भीती वाटत नाही" यांचा या यादीतील इतरांसह समावेश झाला आहे. टेनिस स्टार सेरेना विल्यम्स आणि नाओमी ओसाका यांच्याही यादीत एली नॉर्मन, विपणन व संप्रेषण संचालक, फॉर्म्युला 1, कॅथी एंगेल्बर्ट, आयुक्त, डब्ल्यूएनबीए, फिफा सामौरा, महासचिव, फिफा, विशेष ऑलिम्पिकचे सीईओ मेरी डेव्हिस आणि महिला क्रिकेट, ईसीबीच्या व्यवस्थापकीय संचालक क्लेर कॉनर यांचा समावेश आहे.

दरम्यान, नीता अंबानी यांच्या मुंबई इंडियन्स संघाने रेकॉर्ड चार वेळा इंडियन प्रीमियर लीगचे (आयपीएल) जेतेपद मिळवले आहे. आयस्पोर्टकनेक्टने सांगितले की शॉर्टलिस्ट केलेल्या यादीमध्ये भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा आणि भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राज यांचाही समावेश आहे.