Live Cricket Streaming of Bahrain vs Qatar, T20 2020 Online: कतार विरुद्ध बहरीन यांच्यातील टी-20 सामना आणि लाईव्ह स्कोर पाहण्यासाठी येथे क्लिक करा

एसीसी वेस्टर्न रीजन टी-20 स्पर्धेला (ACC Western Region T20 Series) सुरूवात झाली आहे. तसेच आज 25 फेब्रुवारी रोजी बहरीन आणि कतार (BAH vs QAT Live Streaming) यांच्यात ओमानमधील अल अमरात क्रिकेट मैदानात 12 वा सामना खेळला जाणार आहे. कतार आणि बहरीन हे दोन्ही संघ गट अ मध्ये आहेत. दरम्यान, कतारच्या संघाने उत्कृष्ठ कामगिरी करून आतापर्यंत खेळलेल्या गेलेल्या दोन्ही सामन्यात विजय मिळवला आहे. तर, दुसरीकडे बहरीनचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर आहे. यामुळे आजचा सामना पाहणे रोमांचक ठरेल, असे म्हटले जात आहे. कतार आणि बहेरन यांच्यात होणारा रोमांचक क्रिकेट सामना चाहत्यांना खालील लिंकवर पाहता येणार आहे. Bahrain Vs Qatar, Live Cricket Score.

एसीसी वेस्टर्न रीजन टी-20 स्पर्धेत कतार संघाने उत्कृष्ठ कामगिरी बजावली आहे. या स्पर्धेत कताने पहिल्या सामन्यात मालदीव संघाला पराभूत केले तर, दुसऱ्या समान्यात ओमानवर विजय मिळवला आहे. या स्पर्धेत कतारचा खेळाडू कामरान खान यांनी 54 चेंडूनत 88 धावा ठोकल्या आहेत. तर, गोलंदाज ओव्हिस मलिकने 2 सामन्यात 5 बळी घेतले आहेत.

बहरिन विरुद्ध कतार, एसीसी वेस्टर्न रीजन टी -20 सामना कधी पहायचा? तारीख, वेळ आणि ठिकाण तपशील जाणून घ्या.

बहरीन आणि कतार यांच्यात एसीसी वेस्टर्न रीजन टी -२० मालिकेचा सामना 25 फेब्रुवारी, 2020 रोजी ओमानमधील अल अमरात क्रिकेट मैदान येथे खेळला जाणार आहे. हा खेळ स्थानिक वेळेनुसार दुपारी 03:00 वाजता सुरू होणार आहे.

बहरीन विरुद्ध कतार, एसीसी वेस्टर्न रीजन टी -20 सामनाचे थेट प्रक्षेपण कसे पहावे?

दुर्दैवाने, भारतात बहरीन विरुद्ध कतार सामन्यासाठी कोणतेही थेट प्रसारण उपलब्ध नाहीत. कारण भारतात एसीसी वेस्टर्न रीजन टी -२० स्पर्धेचे अधिकृत प्रसारणकर्ता नाहीत.

बहरिन आणि कतार, एसीसी वेस्टर्न रीजन टी -20 सामना मोफत लाइव्ह स्ट्रीमिंग ऑनलाईन कुठे पाहायचे?

या स्पर्धेचे कोणतेही अधिकृत प्रसारक नसले तरी बहरीन विरुद्ध कतार थेट प्रवाह उपलब्ध होईल. हा सामना आशियाई क्रिकेट कौन्सिलच्या यूट्यूब वाहिनीवर प्रवाहित होईल. दरम्यान, कतार विरुद्ध बहरीनचा सामन्यातील  स्कोअरकार्ड  पाहण्यासाठी येथे क्लिक करू शकतात.

बहरीनला उपांत्या फेरीत जागा निश्चित करण्यासाठी हा सामना जिंकने आवश्यक आहे. तसेच स्पर्धेत टिकून राहण्यासाठी ओमानकडून अधिक प्रयत्न केले जात आहे. महत्वाचे म्हणजे या स्पर्धेत त्यांना सर्वोत्तम कामगिरी करून दाखवणे गरजेचे आहे.