IPL पूर्वी क्रिकेटर नितीश राणा अडकला विवाहबंधनात 
नितीश राणा आणि साची मारवाह (फोटो सौजन्य-ट्वीटर)

मुळचा दिल्लीचा असलेला परंतु आयपीएल (IPL)मध्ये कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) कडून खेळणारा तरुण क्रिकेटपटू नितीश राणा (Nitish Rana) याने आपली गर्लफ्रेंड साची मारवाह हिच्या सोबत लग्नाची गाठ बांधली आहे.  

बऱ्याच काळापासून साची आणि नितीश रिलेशनशीपमध्ये होते आणि सोमवारी त्यांनी लग्नगाठ बांधली आहे.यावेळी नितीशला शुभेच्छा देण्यासाठी दिनेश कार्तिक, उन्मुक्त चंद, ध्रुव शौरी हे क्रिकेटपटू तर कोलकाता नाईट रायडर्सचे सीईओ वैंकी मैसूर आणि प्रशिक्षक अभिषेक नायर असे बडे चेहरे उपस्थित होते.

ज2018 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सने नितीश राणावर 3 कोटी 40 लाख रुपयांची बोली लावून आपल्या संघात समाविष्ट केले होते. कोलकाताच्या आधी नितीश हा मुंबईकडून खेळत होता. गेल्या आयपीएलमध्ये जखमी असलेल्या राणाला सर्व सामने खेळता आले नव्हते. पण यंदा त्याला चांगला खेळ करून आपले स्थान कायम ठेवणे आवश्यक असणार आहे.