India vs Australia 3rd Test : मेलबर्न कसोटीतील विजयानंतर विराट कोहलीने दिली छोट्या चाहत्याला खास भेट
विराट कोहली (Photo Credit-IANS)

India vs Australia 3rd Test : मेलबर्न कसोटीतील विजयानंतर विराह कोहली (Virat Kholi) याने विदेशात विजय मिळवणाऱ्या भारतीय कर्णधाराच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. त्यामुळे कोहलीचा परदेशातील 11 वा विजय ठरला. या विजयामुळे कोहली खूपच उत्साही झाला असून त्याच्या चाहत्याला खास भेट दिली आहे.

भारताने 399  धावा काढल्या तर ऑस्ट्रेलियाच्या संघाने 261 धावा काढल्या. तर रविंद्र जडेजा आणि जसप्रीत बुम्रा यांनी तीन विकेट घेतल्या. भारताच्या संघाने 137 सामना जिंकला आणि 2-1 अशी आघाडी घेतली. तर कोहली हा पहिलाच आशियाई कर्णधार ठरला आहे. तसेच सामना संपल्यानंतर कोहलीने स्टेटियममधील त्याच्या चाहत्यांचे धन्यवाद मानले आहेत.

या मेलबर्नच्या सामन्यानंतर कोहलीने स्टेडियमवरील चाहत्याला त्याचे बॅडिंग पॅड दिले आहेत. तसेच कर्णधार पदी कोहलीचा 26 वा कसोटी विजय ठरला आहे.