India Vs Australia 2nd Test: दुसऱ्या दिवसाअखेर भारत 3 विकेट्स, 172
विराट कोहली (Photo Credit-IANS)

India Vs Australia 2nd Test : पर्थ कसोटीमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने दुसऱ्या दिवसअखेर 3 बाद 172 धावा इतकी मजल मारली. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 326 धावांवर आटोपला, त्याला प्रत्युतर देण्यासाठी उतरलेल्या भारताच्या दोन्ही सलामीवीरांची 8 धावांमध्येच विकेट गेली. मात्र कोहलीने सुरुवातीला पुजारा आणि नंतर रहाणेसह अर्धशतकी भागीदारी केली. ऑस्ट्रेलियाकडून स्टार्कने 2 तर हेजलवूडने 1 विकेट घेतली.

मुरली विजय, राहुलनंतर पुजारा 24 धाववांवर बाद झाला. त्यावेळी विराट 82 धावांवर तर रहाणे 51 धावांवर खेळत होता. त्या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 90 धावांची अभेद्य भागीदारी रचली. भारताला अद्याप 154 धावांची गरज आहे. (हेही वाचा : पहिल्या दिवसाअखेर ऑस्ट्रेलियाच्या 277 धावांत 6 विकेट्स)

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेन आणि पॅट कमिन्स यांनी सातव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करून चांगली कामगिरी केली. उमेश यादवने कमिन्सला बाद केले, त्यापाठोपाठ जसप्रीत बुमराने पेनची विकत घेतली. इशांत शर्माने सर्वाधिक 4 बळी घेतले. कमिन्सने 66 चेंडूत 19 धावा  केल्या, करून बाद झाला. पेनने 38, त्यानंतर  मिचेल स्टार्क 10 चेंडूत 6 धावा करून बाद झाला.