ICC World Cup 2019: हे आहेत 2019 विश्वकपमध्ये टिपलेले 7 अविश्वसनीय कॅचेस (Watch Video)
Video Grab/ICC World Cup (Twitter)

Catches win matches...हे काई लोक चुकीचं म्हणत नाही. क्रिकेटमध्ये बैटिंग आणि बॉलिंग जितकी महत्वाची असते तितकच क्षेत्ररक्षणही (fielding) महत्वाचं असतं. सध्या इंग्लंडमध्ये चालू असलेल्या ICC World Cupमध्ये सुद्धा प्रेक्षकांना काही भन्नाट कॅचेस बघायला मिळेले आहे. त्यात बेन स्टोक्सने (Ben Stokes) विश्वकपच्या पहिल्याच सामन्यात डिप मिडविकेट जवळ उलट्या दिशेने उडी मारून घेलेला झेल, इंग्लंडच्याच ख्रिस वोक्सने ने कव्हर सीमावर टिपलेला इमाम उल हकचा अविश्वसनीय कैच किंवा वेस्ट इंडिसच्या शै होप (Shai Hope) ने टिपलेला एक हाती झेलही समाविष्ट आहे. (India vs Pakistan ICC World Cup 2019: बाप रे बाप! Father's Day चा संदर्भ देत भारत विरुद्ध पाकिस्तान मॅच साठी Star Sports ने शेअर केला हटके प्रोमो (Watch Video)

इतकेच नव्हे, तर वोक्सने टीमच्या दुसऱ्या सामन्यात पाकिस्तान विरुद्ध 3 विकेट्स पटकावले आणि 4 कॅचही पकडले. 44 वर्षांच्या वर्ल्ड कपच्या इतिहासात ४ कॅच आणि विकेट घेणारा वोक्स पहिला खेळाडू ठरला आहे. वोक्सने या मॅचमध्ये इमाम उल हक (Imam Ul Haq), बाबर आजम(Babar Azam), मोहम्मद हाफिज (Mohamamd Hafiz) आणि सरफराज अहमद (Sarfraz Ahmed) यांचे कॅच पकडले. वर्ल्ड कपच्या इतिहासात एका मॅचमध्ये 4 कॅच पकडणारा वोक्स चौथा क्रिकेटपटू आहे. पहिल्यांदा भारताच्या मोहम्मद कैफने 2003 वर्ल्ड कपमध्ये श्रीलंकेविरुद्ध हे रेकॉर्ड केलं होतं. यानंतर 2015मध्ये बांगलादेशच्या सौम्य सरकार आणि पाकिस्तानच्या उमर अकमलने 4-4 कॅच पकडले होते.

 

विश्वकपमध्ये सर्वाधिक कॅच पकडण्याचं विक्रम ऑस्ट्रेलियाच्या रिकी पाँटिंगच्या नावावर आहे. पाँटिंगने 46 मॅचमध्ये २८ कॅच घेतले आहेत. सनथ जयसूर्याने 38 मॅचमध्ये 18 कॅच घेतले आहेत. ह्या यादीमध्ये भारतीय अनिल कुंबळे आहे. कुंबळेने 18 सामन्यांत 14 कॅच पकडले आहेत.