ICC World Cup 2019: आर अश्विनने केली भारतीय संघाबाबत मोठी भविष्यवाणी
R Ashwin | File Image | (Photo Credits: PTI)
भारतीय (India) गोलंदाजांमध्ये फिरकीचा जादुगार म्हणून ओळखला जाणाऱ्या रविचंद्रन अश्विनने (Ravichandran Ashwin) विश्वकप खेळत असलेल्या भारतीय संघाबाबत एक मोठे विधान केले आहे. अश्विनच्या मते विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वाखाली भारतीय संघ (Team India) 2019 च्या विश्वचषक स्पर्धेत आपले वर्चस्व गाजविले जसे 2003, 2007 मध्ये ऑस्ट्रेलिया (Australia) संघाने केले होते. विश्वचषकाच्या आपल्या पहिल्या दोन्ही सामन्यांत भारताने दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाला पराभूत करून एक प्रभावी विजय मिळवला आहे. (IND vs NZ, ICC Cricket World Cup 2019: ह्या 5 खेळाडूं मधील Battle ठरेल मुख्य आकर्षण)
शिवाय अश्विनने यझूवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आणि कुलदीप यादवची (Kuldeep Yadav) हि प्रशंसा केली. अश्विन म्हणाला, "चहल आणि कुलदीप चांगली कामगिरी करत आहेत. विश्वचषक स्पर्धेतही चहलने चांगले प्रदर्शन केले आहे." आजकाल ऑफ स्पिनर्सना जास्त प्राधान्य मिळत नाही परंतु अश्विन म्हणाला की हि गोष्टी लवकरच बदलेल.
रिकी पॉंटिंगच्या (Ricky Ponting) नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलिया संघाने 2003 आणि 2007 च ICC क्रिकेट विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम केला होता. ऑस्ट्रेलियाने आत्तापर्यंत रेकॉर्ड 5 विश्वकप जिंकले आहे तर भारताने दोनदा, 1983 आणि 2011, मध्ये विश्वकप जिंकले आहे.