ICC World Cup 2019: भारत-न्यूझीलंड सामना पाण्याखाली, तरीही धोनी ने आपल्या कृत्याने जिंकली चाहत्यांची मन (Video)
Photo Credit: PTI

भारत (India) -न्यूझीलंड (New Zealand) मध्ये गुरुवारी होणारा विश्वकप मधील सामना पावसामुळे पाण्याखाली गेला. त्यामुळे चाहत्यांची निराशाही झाली पण एम एस धोनी (MS Dhoni) ने असं काही केलं ज्याने मैदानात उपस्थिथांची मन जिंकून घेतली. धोनी वरच्या प्रेमापोटी चाहते उत्साहाने ड्रेसिंग रूम खाली धोनी च्या नावाचा जयघोष करत होते आणि धोनी ने सुद्धा चाहत्यांना निराश केले नाही आणि ड्रेसिंग रूम च्या बाल्कनीत येऊन चाहत्यांना संबोधित केले. (ICC World Cup 2019: एम एस धोनी आणि विराट कोहलीचे चाहते Twitter वर आमने-सामने)

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडिया वर ट्रेंड होत आहे. धोनी कुठे हि असो, कुठल्याही देश मध्ये किंवा विरुद्द खेळात असो, प्रत्येक वेळी धोनी हा चाहत्यांसाठीच मोठं आकर्षण असतो. शिवाय, आधी चाहत्यांची धोनीला बघण्याची प्रबळ इच्छा पाहून, प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी ड्रेसिंग रूमच्या बाल्कनी येऊन धोनी ची जर्सी वरचा No ७ चाहत्यांकडे प्रदर्शित केला.

दरम्यान, भारत-न्यूझीलंड सामना रद्द झाल्याने दोन संघाना एक-एक गुण देण्यात आले. क्रिकेट वर्तुळात सध्या इंग्लंड मधील विश्वकप धोनी चे शेवटचे असल्याचे बोलले जात आहे. विश्वकप च्या सुरुवातीलाच भारतीय संघाच्या पहिल्या विजयापेक्षा महेंद्रसिंग धोनीच्या ग्लोव्हजवर असलेल्या 'बलिदान बॅज'चीच चर्चा रंगली होती. ICC ने बजावल्या नंतर धोनी ने बॅज आपली ग्लोव्हस वरून काढून टाकले आहे.