हिरा है सदा के लिए! चहल टीव्हीवर हार्दिक पंड्याने व्यक्त केलं त्याच 'Diamond' प्रेम, Wrist-Watch ची किंमत जाणून तुम्हीही थक्क व्हाल
(Image Credit: BCCI TV Video Screenshot)

सोनं, हिरे जडीत दागिने कोणाला नाही आवडत. मुलीं प्रमाणे मुलांनाही सोने, चांदी, किंवा हिरे जडीत दागिन्यांचे आकर्षण असते. भारताचा अष्टपैलू हार्दिक पंड्या (Hardik Pandya) ही या काही अपवाद नाही. नुकत्याच झालेल्या चहल टीव्ही (Chahal TV) च्या एका भागात हार्दिकने आपल्या 'Diamond' प्रेमबाबत उलगडा केला आहे. हार्दिकने विश्वकपसाठी डायमंड स्पेशल चेन बनवली आहे ज्यात बॅट आणि बॉल आहे. या व्यतिरिक्त हार्दिकने डायमंडची अंगठी आणि घड्याळ सुद्धा बनविलेले आहेत. (ICC World Cup 2019 मध्ये Ind Vs Pak दरम्यान सचिन तेंडुलकर सोबत तुलना झालेल्या रोहित शर्माच्या Upper Cut वर सचिनचा खास रिप्लाय)

करोडोंचे घड्याळ

मीडियाच्या अहवालानुसार, हार्दिकने पाटेक फिलिप नुटेलियस (Patek Philippe Nautilus) कंपनीचा हिरे जडित घड्याळ घातले आहे. त्याची किंमत सुमारे 3 कोटी रुपये आहे असे सांगितले जात आहे. हे घायाळ 18 कॅरेट सोन्याचे बनलेला असून त्यात डायमंड कोरलेले आहे. शिवाय हार्दिकच्या चेन, अंगठी आणि डायमंड लटकन ही अत्यंत महाग आहे.

काही महिन्यापूर्वी 'कॉफी विथ करन' मध्ये आपली जीवनशैली बद्दल सांगताना हार्दिक अडचणीत अडकला होता. महिलांबद्दल आक्षेपार्ह विधान करण्याबाबत हार्दिक आणि के. एल. राहुलला ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून परत बोलावण्यात आले होते.