Global T20: युवराज सिंह याच्या संघाने नोंदवला निषेध, मानधन न मिळाल्याने दिला खेळण्यास नकार
युवराज सिंह (Photo Credits: Getty Images)

टीम इंडियाचा माजी 'सिक्सर किंग' युवराज सिंह (Yuvraj Singh) याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर ग्लोबल टी-20 स्पर्धेत खेळण्यास सुरुवात केली. मागील काही सामन्यात युवराजने उत्कृष्ट फलंदाजी केली करत चाहत्यांचे मनोरंजन केले आहेत. पण युवराज आणि त्याचा संघ एका मोठ्या वादात अडकला आहे. बुधवारी युवराजचा संघ टोरंटो नॅशनल (Toronto National) आणि मॉन्टरियल टायगर्स (Montreal Tigers) या संघामध्ये सामना होणार होता. मात्र हा सामना सुरु झाला नाही. मीडिया रिपोर्टनुसार दोन्ही संघाचे खेळाडू वेळेत पोहचले नाहीत म्हणून हा सामना उशीरा सुरु झाला. याचे कारण म्हणजे 18 सामने होऊनही युवराजसह अन्य खेळाडूंना मानधन मिळालेले नाही. मानधन न मिळाल्याने खेळाडूंनी सामना खेळण्यास नकार दिला. त्यानंतर खेळाडूंची मनधरणी केल्यानंतर अखेरीस दोन तास उशीराने या सामन्याला सुरूवात झाली. (Global T20 लीगदरम्यान पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूने उमर अकमल याला दिली Match-Fixing ची ऑफर, PCB चा हस्तक्षेप करण्यास नकार)

उशिराने सुरु झालेल्या या सामन्यात टोरांटो संघाने बाजी मारली. टोरांटो संघाने मॉन्टरियल टायगर्सना 35 धावांनी पराभूत केले.

दरम्यान, याआधी ग्लोबल टी-20 सामन्यात मॅच फिक्सिंग झाल्याचा प्रकार घडल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. ग्लोबल टी-20 लीग कॅनडामध्ये भारताबरोबर अन्य देशांचे खेळाडू झाले आहेत. पाकिस्तानचा मधल्या फळीतील फलंदाज उमर अकमल याने त्याला मॅच फिक्स करण्यासाठी विचारण्यात आल्याचे त्याने उघडकीस केले. अकमल विनीपेग हॉक्स संघाकडून खेळत आहे. फिक्सिंग आणि पाकिस्तान यांचे फार जुने संबंध आहेत. याआधी पाकिस्तान सुपर लीगमध्ये नासिर जमशेद, शर्जील खाल, खालिद लतीफ यांसारखे युवा खेळाडू स्पॉट फिक्सिंगमध्ये अडकले होते. यात पाकिस्तान टेस्ट संघाचे माजी सलामीवीर मंसूर खान आणि दुसऱ्याचे कृष नावाच्या व्यक्तीचा समावेश असल्याचे बोलले जात आहे. अकमलशी या दोघांनी मॅच फिक्सिंगसाठी संपर्क साधला. शिवाय त्याच्याकडून काही गोष्टी देखील जाणून घेण्याचा प्रयत्न केला.