भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळवून Arzan Nagwaswalla रचला इतिहास, 46 वर्षांनंतर प्रथमच असे घडले
Arzan Nagwaswalla (Photo Credit: Twitter)

यावर्षी जूनमध्ये होणाऱ्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी (ICC World Test Championship Final) बीसीसीआयच्या (BCCI) वरिष्ठ निवड समितीने शुक्रवारी भारताच्या कसोटी संघाची घोषणा केली. यासह इंग्लंडविरुद्धच्या खेळण्यात येणाऱ्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठीदेखील कसोटी संघाची निवड करण्यात आली आहे. दरम्यान, इंग्लंड विरुद्ध खेळण्यात येणाऱ्या कसोटी मालिकेसाठी गुजरातचा (Gujarat) वेगवान गोलंदाज अर्जन नागवासवाला (Arzan Nagwaswalla) या युवा गोलंदाजाला संधी देण्यात आला आहे.

अर्जन नागवासवाला 23 वर्षांचा आहे. इतक्या लहान वयातच त्याने इतिहास घडविला आहे. 46 वर्षानंतर तो भारतीय पुरुष संघात निवडला जाणारा पहिला पारशी क्रिकेटपटू ठरला आहे. याआधी फारुख इंजीनियर हे भारतीय संघाचा भाग होते. हे देखील वाचा- MS Dhoni: महेंद्रसिंह धोनीच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन; पत्नी साक्षीने शेअर केला व्हिडिओ

ट्वीट-

अर्जन नागवासवाला गुजरातमधील वलसाड जिल्ह्यातील नारगोल खेड्यातील आहे. त्याने आपल्या राज्यात 16 प्रथम श्रेणी, 20 यादी अ आणि 15 टी-20 सामने खेळले आहेत, ज्यात त्याने अनुक्रमे 62, 39 आणि 21 बळी घेतले आहेत.

भारतीय महिला राष्ट्रीय क्रिकेट संघाबद्दल बोलायचे झाले तर, डायना एडुलजी ही शेवटची पारशी महिला क्रिकेटपटू होती जिने भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले होते. 1993 मध्ये त्याने शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता.