भारताचा माजी फलंदाज वसीम जाफरने (Wasim Jaffer) अलीकडेच भारतीय युवा सलामीवीर पृथ्वी शॉचे (Prithvi Shaw) कौतुक केले आणि भारतीय क्रिकेटचा भावी सुपरस्टार होण्यासाठी त्याच्यात सर्व गुण आहेत असे जाफरचे मत आहे. शॉ हा सध्या देशातील सर्वात हुशार युवा खेळाडूंपैकी एक आहे आणि त्याने आपल्या उदात्त फलंदाजी कौशल्यांने अनेकांना प्रभावित केले आहे. त्याच्या शालेय काळापासूनच शॉ आपल्या कामगिरीने प्रभावित केले आणि 2018 मध्ये अंडर-19 वर्ल्ड कप विजयात भारतीय टीमचे नेतृत्व केले. त्यानंतर 2018 मध्ये भारताकडून (India) कसोटी सामन्यात पदार्पण केल्यापासून या युवा फलंदाजाने मागे वळून पहिले नाही आणि ऑस्ट्रेलिया मालिकेपूर्वी दुखापत होण्याआधी सलामी फलंदाज म्हणून त्याच्या जागी जवळपास स्थान निश्चित केले होते. 2018 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी सामन्यात शॉने एक अविस्मरणीय शतक ठोकले होते. त्याने 134 धावांच्या डावात आपल्या कौशल्यांचा आणि स्वभावाने अनेकांना प्रभावित केले. (सचिन तेंडुलकर, विराट कोहली की रोहित शर्मा... कोण आहे मर्यादित षटकांमधील सर्वोत्तम फलंदाज, अवघड प्रश्नाचे 'रणजी किंग' वसीम जाफरने दिले उत्तर)
यंदा फेब्रुवारीमध्ये न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेत भारताकडून अखेरच्या सामन्यात खेळलेल्या जाफरने शॉला पुढील सेहवाग म्हणून संबोधले. “मला वाटते की तो एक खास खेळाडू आहे, यात काही शंका नाही. तो मारत असलेले शॉट्स, जर तो पुढे जात राहिला तर त्याच्याकडे पुढील वीरेंद्र सेहवागची क्षमता आहे," जाफरने यूट्यूब वाहिनीवर म्हटले. "तो गोलंदाजांचा हल्ला पूर्णपणे नष्ट करू शकतो. पण मला कुठेतरी असे वाटते की आपला खेळ समजून घेण्याची त्याला गरज आहे. गरज असेल तिकडे बॅकफूटवर जाणं हे त्याला शिकावं लागेल. न्यूझीलंडमध्ये तो दोनवेळा शॉर्ट बॉलवर बाद झाला, यासाठी त्याला मेहनत घ्यावी लागेल.”
मैदानासोबतच मैदानाबाहेर पृथ्वीच्या वागण्यात शिस्त यायला हवी असं मत जाफरने व्यक्त केलं. जाफर म्हणाला, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये यशस्वी होण्याचे सर्व गूण पृथ्वीमध्ये आहेत. मात्र यासाठी त्याच्या वागण्यात थोडी शिस्त यायला हवी. न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेच्या दुसऱ्या सामन्यात शॉने दमदार अर्धशतक झळकावले होते. तथापि, यजमानांकडून संपूर्ण वर्चस्व राखल्यानंतर भारताने दोन सामन्यांची मालिका 2-0 ने गमावली. इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) नव्या हंगामात शॉ दिल्लीच्या कॅपिटलसाठी अॅक्शनमध्ये दिसणार होता पण कोरोना व्हायरसमुळे स्पर्धा पुढे ढकलण्यात आली.