Coronavirus च्या पार्श्वभूमीवर श्रेयस अय्यर आणि हार्दिक पांड्या घरी बसून करत होते मस्ती, 'हात धुवून घ्या' म्हणाला केएल राहुल
श्रेयस अय्यर आणि केएल राहुल (Photo Credit: Instagram)

कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर, क्रीडा जग आता ठप्प झाले आहे. साथीच्या रोगाचा प्रसार रोखण्यासाठी सर्व मोठी कारवाई रोखली गेल्याने क्रिकेटपटू सोशल मीडियाचा वापर स्वतःचे मनोरंजन करण्यासाठी करत आहेत. भारतीय क्रिकेट संघाचा (Indian Team) फलंदाज श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) आपला सर्व वेळ सोशल मीडियावर घालवत आहे. दोन दिवसांपूर्वी जिथे त्याने कोरोनापासून बचाव करण्यासाठी हँडशेकऐवजी नमस्ते करण्याचा सल्ला दिला. मंगळवारी त्याने हार्दिक पांड्या (Hardik Pandya) सोबत मस्ती करताना एक मजेदार पोस्ट शेअर केली. वास्तविक, अय्यर यांचे पोस्ट जरा गोंधळात टाकणारी होती. या पोस्टमध्ये श्रेयसने हातात एक महागडं घड्याळ घेतलं होतं आणि त्याच्या संपूर्ण हातावर टॅटू होत. फोटो शेअर करताना श्रेयस म्हणाला की आता तुम्ही डावीकडे स्वाइप करा, तसे करताच फोटोच गुप्त रहस्य उघडले. (COVID-19: कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सचिन तेंडुलकर, पीव्ही सिंधू, सानिया मिर्झा समवेत दिग्गजांनी स्वीकारले WHO चे #SafeHands चॅलेंज, पाहा Videos)

श्रेयसच्या फोटोयामध्ये जो हात दिसत आहे तो अय्यरचा नव्हे तर पांड्याचा आहे, परंतु ज्याप्रकारे हा फोटो घेतला आहे त्याने तो हात श्रेयसचा असल्याचे वाटत आहे. पण नंतर दुसरा फोटो पाहिल्यावर तुम्हाला कळेल की हार्दिक त्याच्या सह उभा आहे आणि कॅमेरासमोर हात दाखवत आहे. बघताच अय्यरची पोस्ट व्हायरल झाली. त्याच्या साथीदारांनीही यावर भाष्य करण्यास सुरवात केली. 'तुम्ही दोघे कृपया आपले हात धुवा,' अशी टिप्पणी केएल राहुल (KL Rahul) याने केली. अय्यर आणि पांड्या एकमेकांना हात चिटकवून उभे होते. अशा स्थितीत राहुलने कोरोनापासून बचाव करण्यासाठी दोघांनाही हात धुण्याचे सुचवले.

 

View this post on Instagram

 

Expectation vs Reality....👊🏽😂 Swipe left👈🏾 @hardikpandya93

A post shared by Shreyas Iyer (@shreyas41) on

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक मेळाव्यात फेस मास्क वापरणे,नियमितपणे स्वच्छतेने आपले हात धुणे या काही आवश्यक लोकांसाठी टिप्सदेण्यात आल्या आहेत. यावेळी, सर्व सेलिब्रेटी हँड वॉशसह नवीन मोहीम सुरू केली आहे. यात विराट कोहलीची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा, सचिन तेंडुलकर, पीव्ही सिंधू यांनी प्रत्येक वेळी हात धुण्याचे आवाहन केले आहे.