Happy Birthday Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेट संघाचा संकटमोचक चेतेश्वर पुजारा झाला 33 वर्षाचा; विराट कोहली, केएल राहुल, युवराज सिंह यांच्यासह 'या' भारतीय खेळाडूंकडून शुभेच्छांचा वर्षाव
चेतेश्वर पुजारा (Photo Credit-PTI)

कसोटी क्रिकेटमध्ये राहुल द्रविडनंतर भारतीय संघाची नवीन 'वॉल' म्हणून ओळखला जाणारा चेतेश्वर पुजाराचा (Cheteshwar Pujara) आज वाढदिवस आहे. पुजाराने आपल्या फलंदाजीच्या जोरावर अनेकदा भारतीय संघाला कठीण परिस्थितीतून बाहेर काढले आहे. त्याला एकदिवसीय सामन्यात जास्त संधी मिळाली नाही. परंतु, कसोटी क्रिकेटमधील त्याच्या खेळीने नेहमी राहुल द्रविडची आठवण करून दिली आहे. मात्र, आज त्याच्या 33वा वाढदिवस असल्यामुळे भारताचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli), केएल राहुल (KL Rahul), युवराज सिंह (Yuvraj Singh) यांच्यासह अनेक खेळाडूंनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

चेतेश्वर पुजारा यांचा जन्म 25 जानेवारी 1988 रोजी गुजरातच्या राजकोटमध्ये झाला आहे. पुजाराचे वडील अरविंद पुजारा सौराष्ट्र संघासाठी रणजी चषकात खेळले आहेत. दरम्यान, चेतेश्वर पुजारा याचे कौशल्य पाहून त्याच्या आई वडिलांनी त्याला बालपणापासूनच क्रिकेट खेळण्यासाठी प्रोत्साहन दिले. हे देखील वाचा- IND vs ENG Series 2021: 'टीम इंडिया' सर करण्यासाठी इंग्लंडची तयारी सुरु, हा तडाखेबाज ऑलराउंडर भारतासाठी रवाना, पहा Photo

ट्विट-

ट्विट-

ट्विट-

ट्विट-

ट्विट-

राहुल द्रविडने 2012 मध्ये क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्यानंतर चेतेश्वर पुजाराला कसोटीत तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची संधी मिळाली. या संधीचे सोने करत पुजाराने त्यावर्षीच न्यूझीलंड संघाविरोधात दमदार फलंदाजी करून आपले पहिले कसोटी शतक ठोकले. न्यूझीलंडविरोधातील हैदराबाद कसोटीत पुजाराने 159 धावांची शानदार खेळी केली होती.

पुजाराने आतापर्यंत एकूण 81 कसोटी आणि केवळ पाच एकदिवसीय सामने खेळले आहेत. कसोटी सामन्यात त्याने ४७.७४ च्या सरासरीने एकूण 6 हजार 111 धाव पूर्ण केल्या आहेत. यात 18 शतके आणि 28 अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच कसोटी सामन्यात नाबाद २०६ त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे.