शाहरुख, सलमान नव्हे, जाहिरात क्षेत्रातही विराट कोहलीचाच षटकार, ब्रँड व्हॅल्यू आहे 1200 कोटी रुपये
अनुष्का शर्मा आणि विराट कोहली | | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

विराट कोहली (Virat Kohli) हे नाव केवळ क्रिकेट विश्वातच नव्हे तर, जाहीरात विश्वातही तितकेच दमदार कामगिरी करते आहे. मैदानातील खेळीप्रमाणेच विराटने जाहिरात विश्वातही आघाडीच्या सेलिब्रेटी आणि मॉडेलला मागे टाकत आपल्या नावाचा ब्रँड निर्माण केला आहे. त्यामुळे सध्या त्याला जाहिरात जगतातील ब्रँडींग बादशाहा असेही म्हटले जाऊ लागले आहे. मीडिया रिपोर्टनुसार विराटची 2018 या वर्षातील ब्रँड व्हॅल्यू ही तब्बल 1200 कोटी रुपये इतकी होती. हा आकडा शाहरख खान ( Shah Rukh Khan), सलमान खान, अक्षय कुमार आणि बिग बी बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या ब्रँड व्हॅल्यूपेक्षा कितीतरी अधिक आहे. Duff & Phelps ने नुकताच Celebrity Brand Valuation अहवाल प्रसिद्ध केला. 'The Bold, the Beautiful and the Brilliant'असे या अहवालाचे नाव आहे. या अहवालात टॉप 20 सेलिब्रेटींची ब्रँड व्हॅल्यू दिलेली आहे.

ब्रँड व्हॅल्यूमधील टॉप 10 सेलिब्रेटी

  • दीपिका पादुकोण, 2, 723 कोटी रुपये
  • अक्षय कुमार, 3, 475 कोटी रुपये
  • रणवीर सिंह, 4, 444 कोटी रुपये
  • शाहरुख खान, 5, 428 कोटी रुपये
  • सलमान खान, 6, 393 कोटी रुपये
  • अमिताभ बच्चन, 7, 290 कोटी रुपये
  • आलिया भट्‌ट, 8, 254 कोटी रुपये
  • वरुण धवन, 9, 223 कोटी रुपये
  • ऋतिक रोशन, 10, 218 कोटी रुपये

(हेही वचा, मुकेश अंबानी ठरले देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; पाहा इतकी आहे संपत्ती)

विराटच्या ब्रँड व्हॅल्यूमध्ये 18 टक्क्यांची वाढ

दरम्यान, सेलिब्रेटींच्या ब्रँड व्हॅल्यूमध्ये विराट कोहली टॉपला आहे. गेली दोन वर्षे त्याने आपले हे स्थान कायम ठेवले आहे. 2017च्या तुलनेत 2018 मध्ये विराटची ब्रँड व्हॅल्यू 18 टक्क्यांनी वाढली आहे. विशेष म्हणजे अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत लग्न केल्यावर त्याची ब्रँड व्हॅल्यू अधिकच वाढली आहे. प्राप्त माहितीनुसार हे कपल सुमारे 40 ब्रँड एंडॉर्स करते. यात Head and Shoulders, Pepsi, Manyavar, Celkon, Boost, Audi, Fastrack, Gionee, Wrogn आणि Polaroid यांसारख्या ब्रँडचा समावेश आहे.