India T20 World Cup 2021 Squad: शार्दूल ‘लॉर्ड’ ठाकूरचा भारताच्या अंतिम 15 संघात प्रवेश, माही इफेक्टची नेटकऱ्यांमध्ये चर्चा
शार्दूल ठाकूर (Photo Credit: PTI)

India T20 World Cup 2021 Squad: बीसीसीआयने (BCCI) आगामी टी-20 विश्वचषक 2021 साठी सुधारित भारतीय संघाची (Indian Team) घोषणा केली आहे. आधीच जाहीर करण्यात आलेल्या 15 सदस्यीय संघात एक बदल करण्यात आला असून डावखुरा फिरकी गोलंदाज अक्षर पटेलच्या (Axar Patel) जागी वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरला (Shardul Thakur) मुख्य संघात स्थान देण्यात आले आहे. अक्षर आता शार्दुलच्या जागी राखीव खेळाडू म्हणून संघासोबत असेल. शार्दूलला टीम इंडियात (Team India) सामील केल्यावर सोशल मीडियावर यूजर्समध्ये बोर्डाच्या या निर्णयामागे ‘माही इफेक्ट’ची सध्या चर्चा रंगली आहे. टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या आयपीएल 2021 मध्ये गोलंदाजी करत नव्हता. तसेच त्याच्या फिटनेसबाबत प्रश्न उपस्थित केले जात होते. त्यामुळे ठाकूरला संघात समाविष्ट करण्यात आले आहे. त्याने अनेकदा वेगवान गोलंदाजीसह फलंदाजीने देखील स्वतःला सिद्ध करून दाखवले आहे. (ICC T20 World Cup 2021: अक्षर पटेलची बदली म्हणून ‘या’ स्टार अष्टपैलू खेळाडूची टीम इंडियात एन्ट्री, IPL सह गाजवलंय ऑस्ट्रेलिया-इंग्लंडचं मैदान)

सध्याच्या आयपीएल (IPL) हंगामात तो चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघाचा सदस्य आहे. याशिवाय एमएस धोनी  (MS Dhoni) सीएसकेचा (CSK) कर्णधार आहे आणि त्याला टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेसाठी संघाचे मार्गदर्शकाची जबाबदारी देखील देवण्यात आली आहे. अशा परिस्थितीत शार्दुलचा भारतीय संघात समावेश करण्यासाठी धोनीने बीसीसीआयकडे शब्द टाकला असेल अशी जोरदार चर्चा रंगली आहे. अक्षर आता स्टँड-बाय खेळाडूंच्या यादीत आहे, ज्यात श्रेयस अय्यर आणि दीपक चाहरचा समावेश आहे. “संघ व्यवस्थापनाशी चर्चा केल्यानंतर अखिल भारतीय वरिष्ठ निवड समितीने शार्दुल ठाकूरला मुख्य संघात सामील केले आहे. 15 सदस्यीय संघाचा भाग असलेले अष्टपैलू अक्षर पटेल आता स्टँड-बाय खेळाडूंच्या यादीत असेल,” बीसीसीआयने एका निवेदनात म्हटले आहे. टीम इंडियात शार्दूल ठाकूरच्या एन्ट्रीवर पाहा नेटकऱ्यांची प्रतिक्रिया:

धोनी प्रभाव!

सर्व श्रेय धोनीला जाते...

मार्गदर्शक MS Dhoni चे पाऊल!

प्रत्येकजण धोनीला...

धोनीचा द्वेष करणारे आता...

दुसरीकडे, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) असेही घोषित केले की आवेश खान, उमरान मलिक, हर्षल पटेल, लुकमन मरीवाला, व्यंकटेश अय्यर, कर्ण शर्मा, शाहबाज अहमद आणि कृष्णप्पा गौतम स्पर्धेच्या तयारीसाठी भारतीय संघाला मदत करतील.