Top Sports Handles In India: सचिन आणि रोहित ला पछाडून विराट कोहली बनला मोस्ट Tweeted प्लेयर, धोनी बद्दलच्या 'या' ट्वीटला मिळाली सर्वाधिक यूजर्सची पसंती
विराट कोहली आणि महेंद्र सिंह धोनी (Photo Credits- PTI)

क्रीडा विश्वातील अनेक खेळाडू सध्या सोशल मीडियावर सक्रिय असलेले दिसुन येतात. ब्रँड प्रमोशनपासून, एखाद्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणे किंवा एखाद्या विषयावर मत प्रदर्शित करणे हे क्रीडा व्यक्तिमत्व सोशल मीडियाचा चांगला उपयोग केला आहे. मायक्रो ब्लॉगिंग साइट ट्विटरने (Twitter) यंदाच्या वर्ष 2019 मध्ये सर्वाधिक ट्विटेड क्रीडा व्यक्तिमत्वांची नावं जाहीर केली आहे. पुरुष क्रिकेटपटूंच्या या यादीत विराट कोहली (Virat Kohli) याचे नाव पुन्हा अव्वल क्रमांकावर आहे. विराटच्या चाहत्यांची दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. विराट त्याच्या खेळासह त्याच्या ट्विटरवरील पोस्टने देखील चाहत्यांचे मनोरंजन करत आहे. यात दुसऱ्या क्रमांकावर आहे माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी (Mahendra Singh Dhoni), त्यानंतर रोहित शर्मा तिसऱ्या, सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, भरभजन सिंह, युवराज सिंह, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा आणि जसप्रीत बुमराह. विश्वचषकनंतर एकही मालिका न खेळल्या धोनीची प्रसिद्धी जराही कमी झाली नाही. (पंतप्रधान नरेंद्र मोदीं चे 'हे' ट्विट ठरले 'गोल्डन ट्विट ऑफ द ईअर'; ज्याला मिळाले 4 लाख 20 हजार लाइक्स, वाचा सविस्तर)

यामध्ये महिला खेळाडूंच्या यादीत स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू हिने बाजी मारली आहे. महिलांच्या या यादीत भारतीय संघातील फक्त दोन खेळाडूंचा समावेश आहे. मिताली राज पाचव्या, तर युवा सलामी फलंदाज स्मृती मंधाना सातव्या क्रमांकावर आहे. धिंग एक्सप्रेसच्या नावाने प्रसिद्ध धावपटू हिमा दास हिने दुसरे, तर टेनिसमधून विश्रांती घेतलेल्या सानिया मिर्झा हिने तिसरे स्थान पटकावले आहे.

टॉप स्पोर्ट्स हँडल इन इंडिया-मेल

टॉप स्पोर्ट्स हँडल इन इंडिया-फिमेल

सर्वाधिक क्रीडा-संबंधित ट्विट

इतकेच नाही तर, धोनीच्या वाढदिवशी कोहलीने दोघांचे फोटो शेअर करताना केलेले भावनिक ट्विट भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी खूप खास ठरले. विराटने हे ट्विट क्रिडा-संबंधित सर्वाधिक ट्विट म्हणून ट्विटर इंडियाकडून जाहीर करण्यात आले. हे ट्विट 45,000 हून अधिक लोकांनी रीट्वीट केले आणि चार लाखांहून अधिक लोकांनी त्यांना पसंत केले. यावर्षी भारतातील क्रीडा क्षेत्रातील हे ट्विट सर्वात जास्त चर्चेत राहिले. शिवाय, अवकाश संशोधनात भारताच्या योगदानावर प्रकाश टाकण्याबरोबरच जगाने ट्विटरवर संबंधित प्रत्येक विकासावर प्रतिक्रिया व्यक्त केली.