IND vs AUS Test Series 2023: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीत 'हे' खेळाडू दाखवु शकतात आपला जलवा, पहा कोण आहे ते दिग्गज
Team India (Photo Credit - Twitter)

टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील बहुप्रतिक्षित बॉर्डर-गावसकर ट्रॉफीचे (Border-Gavaskar Trophy) काउंटडाऊन सुरू झाले आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना नागपुरात (Nagpur) खेळवला जाणार असून, त्यासाठी एका आठवड्यापेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे. यावर्षी टीम इंडियाने वनडे (ODI) आणि टी-20 (T20) मॅचमध्ये धमाकेदार सुरुवात केली आहे. टीम इंडियासाठी ही मालिका खूप महत्त्वाची आहे, कारण त्याचा निकाल ठरवेल की ते सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) च्या फायनलमध्ये खेळणार की नाही. या मालिकेत टीम इंडियाच्या चार खेळाडूंवर मोठी जबाबदारी असणार आहे. (हे देखील वाचा: IND vs AUS Test Series 2023: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यात 'या' भारतीय फलंदाजांनी झळकावली आहेत सर्वाधिक द्विशतके, पहा खेळाडूंची यादी)

सर्वांच्या नजरा या खेळाडूंवर असतील

विराट कोहली

टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज विराट कोहली उत्कृष्ट लयीत आहे. आशिया कप 2022 नंतर विराट कोहलीने मागे वळून पाहिलेच नाही. यादरम्यान विराट कोहलीने टी-20 आणि एकदिवसीय क्रिकेटमधील शतकाची प्रतीक्षा संपवली आहे. आता प्रतीक्षा कसोटी क्रिकेटमध्ये शतकाची आहे. किंग कोहलीच्या बॅटमधून शेवटचे कसोटी शतक 2019 मध्ये बांगलादेशविरुद्ध झाले होते. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी क्रिकेटमध्ये विराट कोहलीची आकडेवारी विलक्षण आहे. किंग कोहलीने 20 सामन्यांमध्ये 48.05 च्या सरासरीने 1,682 धावा केल्या आहेत.

शुभमन गिल

टीम इंडियाचा युवा सलामीवीर शुभमन गिल जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. अलीकडेच, न्यूझीलंडविरुद्धच्या T20 सामन्यात शुभमन गिलने 126 धावांची खेळी खेळून तिन्ही फॉरमॅटमध्ये पाचवा भारतीय फलंदाज होण्याचा मान मिळविला आहे. गेल्या वर्षी बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये शुभमन गिलने 51.58 च्या सरासरीने 259 धावा केल्या होत्या.

रवींद्र जडेजा

टीम इंडियाचा दिग्गज अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा 5 महिन्यांनंतर टीम इंडियात पुनरागमन करण्यास तयार आहे आणि नेटवर घाम गाळत आहे. रवींद्र जडेजाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 12 सामन्यात 63 विकेट्स घेतल्या आहेत, ज्यापैकी त्याने 3 वेळा पाच किंवा त्याहून अधिक विकेट घेतल्या आहेत. याशिवाय 2017 मध्ये रवींद्र जडेजाने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये सर्वाधिक 25 विकेट घेतल्या होत्या.

आर अश्विन

भारत दौऱ्यावर ऑस्ट्रेलियाला सर्वात मोठा धोका आर अश्विनकडून आहे. आर अश्विनची कसोटी क्रिकेटमध्ये भारताची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. मागील 20 कसोटी मालिकेबद्दल बोलायचे झाले तर, आर अश्विन 7 मध्ये मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला आहे.

जाणून घ्या सामन्याचे वेळापत्रक

टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना 9 फेब्रुवारी ते 13 फेब्रुवारी दरम्यान नागपुरात खेळवला जाईल. त्याचवेळी, दुसरा कसोटी सामना 17 ते 21 फेब्रुवारी दरम्यान दिल्लीत, तिसरा कसोटी सामना 1 मार्च ते 5 मार्च दरम्यान धर्मशालामध्ये आणि चौथा कसोटी सामना 9 मार्च ते 13 मार्च दरम्यान अहमदाबादमध्ये खेळवला जाईल.