मुंबई: भारतीय संघ आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यातील तीन एकदिवसीय मालिकेतील (ODI Series) तिसरा आणि शेवटचा सामना उद्या म्हणजेच 15 जानेवारीला तिरुवनंतपुरम (Thiruvananthapuram) येथे खेळवला जाणार आहे. हा सामना दुपारी दीड वाजल्यापासून खेळवला जाईल. टीम इंडियाने (Team India) या मालिकेत 2-0 अशी अजेय आघाडी घेतली असुन मालिकाही खिशात घातली आहे. अशा स्थितीत टीम इंडिया रविवारी म्हणजे उद्या तिसऱ्या सामन्यात क्लीन स्वीपच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे. तिरुअनंतपुरममध्ये टीम इंडियाचा मोठा रेकॉर्ड आहे. (हे देखील वाचा: Rahul Dravid Unwell: राहुल द्रविडच्या प्रकृतीत बिघाड, भारत-श्रीलंकामधील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात राहणार अनुपस्थित)
तिरुवनंतपुरममध्ये कसा आहे टीम इंडियाचा रेकाॅर्ड
तिरुअनंतपुरमच्या ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियममध्ये टीम इंडियाचा रेकॉर्ड उत्कृष्ट राहिला आहे. या मैदानावर आतापर्यंत फक्त एकच एकदिवसीय सामना खेळला गेला आहे. टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज यांच्यात हा सामना खेळला गेला. या सामन्यात टीम इंडियाने वेस्ट इंडिजचा पराभव केला. अशा परिस्थितीत या मैदानावर टीम इंडियाची कामगिरी चांगली झाली आहे. या मैदानावर टीम इंडिया आपला विक्रम आणखी मजबूत करू इच्छित आहे आणि तिसऱ्या वनडेत श्रीलंकेला पराभूत करण्याचा प्रयत्न करेल.
खेळपट्टीचा अहवाल
ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये फिरकी गोलंदाजांना खूप मदत मिळू शकते. अशा परिस्थितीत दोन्ही संघांच्या फिरकी गोलंदाजांचा येथे मोठा फायदा होणार आहे. त्याचबरोबर वेगवान गोलंदाजांनाही सामन्याच्या सुरुवातीला खेळपट्टीचा काहीसा फायदा होईल. त्याचबरोबर या मैदानावर होणाऱ्या सामन्यात दवही मोठी भूमिका बजावणार आहे. अशा परिस्थितीत नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करणाऱ्या संघाला अधिक फायदा मिळू शकतो. अशा स्थितीत या मैदानावर नाणेफेक महत्त्वाची भूमिका बजावेल.
तिसऱ्या वनडेसाठी दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन
टीम इंडिया: शुभमन गिल, हार्दिक पांड्या, रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, सुर्यकुमार यादव, ईशान किशन (विकेटकीपर), अक्षर पटेल, कुलदीप शर्मा, उमरान मलिक, मौहम्मद शमी, मौहम्मद सिराज.
श्रीलंका: पाथुम निसांका, नुवानिडू फर्नांडो, सी अस्लांका, दासुन शानाका (कर्णधार), डीडी सिल्वा, डब्ल्यू हसरंगा, सी करुणारत्ने, दुनिथ वेलालेज, के मेंडिस (विकेटकीपर), लाहिरू कुमारा, के रजिथा.