T20 World Cup 2021: IND vs AFG सामन्यापूर्वी निराश चाहत्यांनी शेअर केले असे मीम्स, पाहा
(Photo Credit - Twitter)

टी-20 वर्ल्ड कपमध्ये (ICC T20 World Cup) टीम इंडियाचा (Team India) बुधवारी अबुधाबीमध्ये महत्त्वाचा सामना आहे. सेमीफायनलच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी भारताला अफगाणिस्तानला मोठ्या फरकाने पराभूत करावे लागणार आहे, अन्यथा टीम इंडियाचा प्रवास इथेच थांबणार आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली सुरुवातीचे दोन्ही सामने गमावल्यानंतर क्रिकेट चाहते खूप मोठ्याप्रमाणे निराश झाले आहेत. अशा परिस्थितीत, आजच्या सामन्यापूर्वी, ट्विटरवरील निराश चाहते यांनी मीम्स शेअर करत विराट कोहलीला एकच प्रश्न विचारत आहेत - आज सामना हरु नको विराट

#INDvsAFG आणि #ViratKohli हे हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड होत आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामन्याबाबत क्रिकेट चाहते ट्विटरवर सतत आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. मात्र, आज चाहत्यांकडून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. युजर्सना ट्रोल करण्याऐवजी यावेळी ते टीम इंडिया आणि विराट कोहलीला सपोर्ट करताना दिसत आहेत. (हे ही वाचा PAK vs NAM, T20 World Cup 2021: पाकिस्तानचा विजयरथ सुसाट, 45 धावांनी नामिबियाला लोळवून सेमीफायनल मध्ये मारली दिमाखदार एन्ट्री.)

या विश्वचषकात भारताचा आतापर्यंतचा प्रवास चांगला राहिलेला नाही आहे. भारताला पहिल्या सामन्यात पाकिस्तानने, तर दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने पराभूत केले होते. अफगाणिस्तान विरुद्धच्या पहिल्या विजयाची प्रतीक्षा संपवण्यासाठी टीम इंडिया बूधवारी मैदानात उतरणार आहे. टीम इंडियाला अजून तीन सामने खेळायचे आहेत. तिने तिन्ही सामने जिंकले तरी भारताला दुसऱ्या संघांवर अवलंबून राहावे लागणार आहे, कारण न्यूझीलंडनेही तिन्ही सामने जिंकले तर भारतीय संघ आपोआप बाद होईल.