T20 World Cup 2021: इंग्लंड संघाला मोठा धक्का, स्टार अष्टपैलू राहू शकतो वर्ल्ड कप स्पर्धे बाहेर
इंग्लंड क्रिकेट टीम (Photo Credit: PTI)

T20 World Cup 2021: युएई आणि ओमान येथे ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कप (T20 World Cup) स्पर्धेपूर्वी इंग्लंड संघाला (England Cricket Team) मोठा धक्का बसू शकतो. इंग्लंडचा स्टार अष्टपैलू बेन स्टोक्स (Ben Stokes) यूएईमध्ये होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेतून बाहेर बसू शकतो. जुलैपासून बेन स्टोक्स मानसिक आरोग्याचा हवाला देत क्रिकेटपासून दूर राहिला आहे. स्टोक्स म्हणाला होता की तो क्रिकेटपासून दूर होत आहे कारण त्याला मानसिक आरोग्यावर  (Mental Health) लक्ष केंद्रित करावे लागते. स्टोक्स भारताविरुद्ध सुरु असलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेचा भाग होता पण त्याने मालिका सुरु होण्यापूर्वीच माघार घेतली आणि 19 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आयपीएल (IPL) 2021 चा दुसरा टप्प्यालाही तो मुकणार आहे. तसेच स्टोक्सने यंदा वर्षाच्या सुरुवातीला बोटाच्या फ्रॅक्चरवर केलेल्या शस्त्रक्रियेतून बरे होत आहे. डेली मेलच्या वृत्तानुसार, स्टोक्सच्या जवळच्या सूत्रांनी दावा केला आहे की, “तो सध्या क्रिकेटबद्दल विचारही करत नाही आहे.” (T20 World Cup 2021 India Squad: भारताच्या टी-20 वर्ल्ड कप संघात कोणत्या खेळाडूंना मिळणार प्रवेश? सूर्यकुमार-सिराजसह ‘हे’ युवा आहेत दावेदार!)

राजस्थान रॉयल्सचे प्रतिनिधित्व करणारा स्टोक्स आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यातून आधीच बाहेर पडला आहे जे या महिन्याच्या अखेरीस यूएईमध्ये सुरू होणार आहे. आयसीसीकडे टी-20 विश्वचषक संघ सादर करण्याची अंतिम मुदत पुढील शुक्रवारी आहे. त्यामुळे इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड पाच वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर खेळल्या जाणाऱ्या मार्की स्पर्धेसाठी स्वतःला उपलब्ध करून देण्यासाठी स्टोक्सवर दबाव आणण्यास तयार नसेल. इंग्लंडने 2016 भारतात आयोजित या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली जिथे त्यांना वेस्ट इंडीजकडून पराभव पत्करावा लागला होता. या अंतिम सामन्यात स्टोक्सने टाकलेल्या अंतिम षटकात कार्लोस ब्रॅथवेटने सरळ चार षटकार ठोकून आपल्या संघाला जेतेपद मिळवून दिले. स्टोक्सने इंग्लंडच्या इतिहासात पहिल्यांदाच 2019 मध्ये एकदिवसीय विश्वविजेते होण्यात महत्वाची भूमिका बजावली आणि प्लेयर ऑफ द टूर्नामेंट म्हणून त्याची निवड झाली.

भारतातील कोविड-19 परिस्थितीमुळे युएईमध्ये टी-20 विश्वचषक आयोजित केला जाणार आहे. 17 ऑक्टोबरपासून स्पर्धेला क्वालिफायर्ससह सुरु होत आहे, तर मुख्य स्पर्धा 24 ऑक्टोबरपासून सुरु होईल. टीम इंडिया पाकिस्तानविरुद्ध दुसऱ्या टी-20 वर्ल्ड कप जेतेपदासाठी आपली मोहीम सुरु करेल.