Suresh Raina React on SSR Death Case: सुशांत सिंह राजपूत प्रकरणावर भारतीय क्रिकेट खेळाडू सुरेश रैना याने 'अशी' दिली प्रतिक्रिया
सुरेश रैना (Photo Credits: File Image)

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने (Sushant Singh Rajput Death Case) 14 जून रोजी मुंबई येथील आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती. सुशांतच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. सुशांत प्रकरणाला जवळपास दोन महिने पूर्ण झाले आहेत. या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी सीबीआय (CBI) तपास करत आहे. सर्व सामान्यांपासून तर अनेक राजकीय नेते आणि कलाकरांनी याप्रकरणावर आपले मत व्यक्त केले आहे. दरम्यान, भारतीय क्रिकेट खेळाडू सुरेश रैना (Suresh Raina) याने सुशांत मृत्यू प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणातील सत्य लवकरच समोर येईल असे त्याने म्हटले आहे.

सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यास सर्वोच्च न्यायालयाने महत्वपूर्ण निकाल दिला आहे. याव्यतिरिक्त सर्व पुरावे सीबीआयकडे सोपवण्याचे आदेशही सर्वोच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांना दिले आहेत. महत्वाचे म्हणजे, सुशांतच्या मृत्यूप्रकरणाचा तपास करण्यासाठी सीबीआयचे एक पथक मुंबईत दाखल झाले आहे. हे देखील वाचा- Sachin Tendulkar Celebrates Ganesh Chaturthi: गणपती बाप्पा मोरया! सचिन तेंडुलकरने केली भगवान गणेशाची स्थापना, पत्नी अंजली आणि मुलगी सारा सोबत केली आरती (See Pics & Video)

सुरेश रैनाचे ट्विट-

सुशांत मृत्यू प्रकरणी सीबीआयने आज सिद्धार्थ पिठाणी, नीरज सिंह याची डीआरडीओ गेस्ट हाऊसमध्ये सकाळी जवळपास 3 तासापेक्षा जास्त वेळ चौकशी केली आहे. त्यानंतर त्यांना सुशांत सिंहच्या वांद्रे स्थित घरी सीबीआय टीम घेऊन गेली आहे. तिथे पिठाणी, नीरज आणि दीपेश सावंत यांना नेण्यात आले होते. तिथे क्राईम सीन रिक्रिएट करण्यात आला. हे सर्व करायला सीबीआयच्या पथकाला जवळपास साडे पाच तास लागले आहे.