Southampton Weather Forecast, 19th June: सलग दुसऱ्या दिवशी WTC फायनल सामन्यात पाऊस बनणार खलनायक? जाणून घ्या साउथॅम्प्टनच्या हवामानाचा अंदाज
साऊथॅम्प्टन 19 जून हवामान अंदाज (Photo Credit: PTI)

Southampton Weather Forecast, 19th June: शुक्रवारी साऊथॅम्प्टनच्या (Southampton) एजस बाउल येथे बहुप्रतीक्षित आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या  (World Test Championship Final) पहिल्या दिवसावर पावसाने पाणी फेरले असताना दुसरा दिवसही काही वेगळा नसणार आहे. कसोटीच्या दुसर्‍या दिवशीही पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. तापमान 18-20-डिग्रीच्या आसपास असेल तर आर्द्रता 80 च्या जवळपास असेल. एकूणच दुसरा दिवस देखील चाहत्यांसाठी निराशा घेऊन येईल. साऊथॅम्प्टन येथे भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणाऱ्या आयसीसी (ICC) जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्याच्या पहिल्याच दिवशी हवामानाच्या असुरक्षित परिस्थितीमुळे एकही चेंडू टाकला गेला नाही. तसेच टॉस देखील होऊ शकला नाही.

सामन्याच्या पहिल्या दिवशी पावसामुळे नाणेफेकीला उशीर झाला आणि सामना अधिकाऱ्यांनी पहिले सत्र रद्द झाल्याची घोषणा केली. चाहत्यांना दुसऱ्या सत्रापासून भारत-न्यूझीलंड महामुकाबला सुरु होण्याची अपेक्षा होती पण ढगाळ वातावरण कायम होते ज्यांनंतर भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7:30 वाजता नियोजित तपासणीपूर्वी पुन्हा एकदा पावसाचा खेळ सुरु झाला त्यानंतर अखेरीस पंचांना दिवसाचा खेळ रद्द करावा लागला. नाणेफेक अजून बाकी आहे, त्यानुसार भारत आणि न्यूझीलंड त्यांच्या मूळ प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करतील का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. भारताने आपली प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली होती, पण न्यूझीलंडने अद्याप तसे केलेले नाही. त्यामुळे नाणेफेकीपूर्वी टीम इंडिया फिरकी गोलंदाजीच्या अष्टपैलू खेळाडूसाठी अतिरिक्त वेगवान गोलंदाजाचा समावेश करू शकते.

दुसरीकडे, कसोटी सामन्याच्या पाच दिवसांत वाया गेलेल्या सत्रांचा खेळ भरून काढण्यासाठी राखीव दिवशी सामना खेळला जाऊ शकतो. 18 ते 22 जून दरम्यान हा सामना खेळवला जाणार आहे तर 23 जूनचा दिवस राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. त्यामुळे आता पहिल्या दिवसाचे दोन सत्र वाया गेल्याने हा नियम लागू झाला असून आनंदाची बाब म्हणजे या नियमामुळे अद्याप सामन्याच्या एकाही ओव्हरचे नुकसान झाले नाही आहे. तसेच परिस्थिती सुधारल्यास संपूर्ण पाच दिवसांचा खेळ होणे अजूनही शक्य आहे. त्यामुळे सहाव्या दिवशी म्हणजेच 23 जून रोजी सामना पाहायला मिळू शकतो.