BCCI अध्यक्ष सौरव गांगूली याचा बेंगलुरू एअरपोर्टवरील सेल्फी पाहून चाहते खूश, ट्विटरवर व्यक्त केल्या प्रतिक्रिया
सौरव गांगुली (Photo Credit: Twitter/@SGanguly99)

सौरव गांगुली (Sourav Ganguly) अजूनही भारतीय क्रिकेटमधील सर्वात लोकप्रिय व्यक्तिमत्त्व आहे याबद्दल काही शंका असल्यास नवनिर्वाचित बीसीसीआय (BCCI) अध्यक्षांनी ती दूर केली. गांगुली काल, बुधवारी एनसीए (NCA) प्रमुख राहुल द्रविड (Rahul Dravid) यांना भरण्यासाठी बेंगळुरूला पोहचला होता. यावेळी त्याला भेटण्यासाठी/पाहण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केली. यावेळी, माजी भारतीय कर्णधाराने सेल्फी काढून चाहत्यांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ट्विटरवर फोटो शेअर केला. बीसीसीआयचे अध्यक्षपद संभाळल्यानंतर गांगुली एकामागून एक सुधारण्याच्या दिशेने पाऊल उचलत आहेत. गांगुलीने 23 ऑक्टोबरला बीसीसीआयचे अध्यक्ष म्हणून कार्यभार स्वीकारला, त्यानंतर आता तो घरगुती क्रिकेटपासून ते सर्व क्षेत्रात सुधारणा करण्यावर भर देत आहे. याचसाठी गांगुलीने द्रविडची भेट घेतली. द्रविड आणि गांगुलीने राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या सुधारणेच्या रोडमॅपवर चर्चा केली. (BCCI अध्यक्ष सौरव गांगुली यांनी घेतली NCA प्रमुख आणि जुना साथी राहुल द्रविड याची भेट, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा)

गांगुलीने ट्विटरवर त्याचा विमानतळाच्या चेक-इन काउंटरवर लोकांच्याभोवती उभा असतानाचा फोटो शेअर केला. एअरपोर्टवर जणूकाही पत्रकारपरिषद सुरु आहे असे चित्र दिसत होते. एयरपोर्टवरील फोटो शेअर करत गांगुलीने लिहिले की, "बेंगळुरूच्या विमानतळावरील चेकवर... लोकांचे प्रेम पाहून खूप कृतज्ञ वाटते." 47 वर्षीय गांगुलीच्या या जेस्चरने चाहत्यांची मनं जिंकली. गांगुलीच्या फोटोवर चाहत्यांनाही भर-भरून प्रतिसाद दिला आणि माजी भारतीय कर्णधाराचे कौतुक केले.

पाहा चाहत्यांच्या प्रतिक्रिया: 

दादा, बंगळुरूमध्ये तुमची किती फॅन फॉलोइंग आहे याची कल्पना नाही!

दादा, भारतीय क्रिकेटसाठी काम करत रहा आणि कसे कार्य करावे हे सर्वांना दाखवा

चेकिन काउंटरवर पत्रकार परिषदेसारखे दिसते

संपूर्ण भारत तुझ्यावर प्रेम करतो दादा...

यापूर्वी गांगुलीने चिन्नास्वामी स्टेडियमवर एनसीए अध्यक्ष राहुल द्रविड यांची भेट घेतली. बीसीसीआयने कर्नाटक सरकारबरोबर मे महिन्यात 25 एकर जागेसाठी करार केला होता. आणि आता त्यांना बंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ सेंटर ऑफ एक्सलन्स तयार करण्यासाठी त्याला अतिरिक्त 15 एकर जागा मिळाली आहे. भारतीय क्रिकेटला नवा प्लांट देण्यासाठी तयार केलेली एनसीए प्रत्यक्षात पुनर्वसन केंद्र बनली आहे आणि स्वत: गांगुलीनेही हे मान्य केले.