भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि विद्यमान बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली सोशल मीडियावर सक्रिय आहे. सध्या संपूर्ण विश्व कोरोना व्हायरसविरुद्ध लढा देत आहे. भारतातही कोरोना संक्रमितांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. सध्या सोशल मीडियावर येणारी प्रत्येक माहिती बरोबरपेक्षा चुकीची असल्याचे सिद्ध होत आहे. अशा स्थितीत ती विचार न करता शेअर करणे अधिक धोकादायक आहे. बरेच लोक या बनावट बातम्यांच्या जाळ्यात अडकतात आणि चुकीची माहिती पुढे शेअर करत राहतात. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली देखील या फेक न्यूजच्या अडकलेला दिसत आहे. कोरोना व्हायरसच्या काळात अनेक बनावट वृत्त सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात आता नासा उपग्रहाचा फोटो शेअर करुन आज भारत कसा दिसेल असे सांगितले आहे. हा फोटो नासाने दिवाळीत भारत कसा दिसतो तेव्हाचा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5 एप्रिल रात्री 9 वाजता9 मिनिटांसाठी दिवे लावण्याची घोषणा केल्यानंतर हा व्हिडिओ ट्विटरवर ट्रेंड होऊ लागला.
हा फोटो नासाने शेअर केला असल्याचा दावा यूजर्सकडून केला जात आहे. या फोटोमध्ये जगातील नकाशात भारत दीपमय झालेला दिसत आहे. गांगुलीने हा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आणि लिहिले,"जग आम्हाला एक पाहतो... होय आम्ही एक आहोत... माझ्या देशाचा अभिमान आहे." सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा फोटो पूर्णपणे बनावट आहे. अशा स्थितीत बनावट बातम्या शेअर केल्यामुळे गांगुलीवर नेटकऱ्यांनी निशाणा साधला आहे.
काहींनी दादाला बनावट फोटो शेअर करण्यासाठी फैलावर घेतलं तर काहींनी असे निदर्शनास आणून दिले की दादाने हा फोटो फक्त प्रतिकात्मकरित्या शेअर केला आहे आणि तो कधीही नासाकडून नमूद केलेला नाही. सध्याच्या कठीण काळात सोशल मीडियावर अनेक वृत्त, फोटोज/व्हिडिओज शेअर केले जात आहे. त्यामुळे, लोकांनी अशा कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवू नये आणि कोणताही विचार न करता ते पुढे पाठवू नये.