Ravi Shastri आणि Rahul Dravid यांची तुलना केल्याप्रकरणी सौरव गांगुलीने दिले ‘कडक’ उत्तर, जाणून घ्या काय म्हणाले BCCI अध्यक्ष
राहुल द्रविड आणि रवि शास्त्री (Photo Credit: PTI)

भारताच्या वरिष्ठ पुरुष संघाचे (Indian Men's Cricket Team) मुख्य प्रशिक्षक म्हणून रवी शास्त्री  (Ravi Shastri) यांचा कार्यकाळ अत्यंत यशस्वी राहिला आणि राहुल द्रविड (Rahul Dravid) यांनी शास्त्रींचा उत्तराधिकारी म्हणून भूमिका चांगल्या प्रकारे सुरु केली आहे परंतु BCCI अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी दोन भिन्न व्यक्तिमत्त्वांच्या डावपेचांची तुलना करणे अयोग्य असल्याचे म्हटले आहे. गेल्या वर्षीच्या टी-20 विश्वचषक (T20 World Cup) स्पर्धेत भारताची मोहीम लवकर संपुष्टात आल्यावर मुख्य प्रशिक्षक म्हणून शास्त्री यांचा कार्यकाळ संपुष्टात आला, त्यानंतर द्रविडने NCA प्रमुखपदाची भूमिका सोडल्यानंतर ही जबाबदारी स्वीकारली. शास्त्रींच्या नेतृत्वात भारताने आयसीसीचे (ICC) विजेतेपद जिंकले नसले तरी ते ऑस्ट्रेलिया (Australia), इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये (South Africa) परदेशात संस्मरणीय विजय मिळवून कसोटीत एक शक्तिशाली संघ म्हणून बहरले.

शास्त्री-विराट कोहली यांच्या संयुक्त विद्यमाने मोठ्या स्पर्धांमध्ये व्हाईट बॉलमधील संघाच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्या आले होते, परंतु द्रविड आणि रोहित शर्मा यांच्या नेतृत्वात टीम इंडियाने त्यांच्या चुका दुरुस्त करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. द्रविडच्या प्रशिक्षणात भारताने दक्षिण आफ्रिकेमध्ये महत्त्वपूर्ण कसोटी मालिका गमावली परंतु संघाने मायदेशात अभूतपूर्व कामगिरी सुरु ठेवली आहे. नुकत्याच संपलेल्या 2-कसोटी मालिकेत लंकन संघाचा सफाया करण्यापूर्वी न्यूझीलंड, वेस्ट इंडिज आणि श्रीलंकेविरुद्ध मर्यादित षटकांच्या मालिकेत विजयी पताका फडकावले. “ते वेगवेगळे व्यक्तिमत्त्व असलेले वेगवेगळे लोक आहेत. एक सदैव तुमच्यासोबत असतो जो त्याची ताकद आहे तर दुसरा सर्वकाळातील महान असूनही शांतपणे त्याचे काम करेल,” पीटीआयने उद्धृत केल्याप्रमाणे गांगुली म्हणाले.

“दोन लोक एकाच प्रकारे यशस्वी होत नाहीत.” गांगुली म्हणाला की त्याचा विश्वास आहे की त्याचा माजी सहकारी द्रविडमध्ये प्रशिक्षक म्हणून त्याच्या सध्याच्या भूमिकेत यशस्वी होण्याचे सर्व गुण आहेत. गांगुली पुढे म्हणाला की द्रविडची ‘तीव्र, सावध आणि व्यावसायिक’ वृत्तीदडपण असलेल्या कामात यशस्वी होण्यासाठी प्रशिक्षकाला आवश्यक असलेले घटक आहेत. “द्रविड खेळाच्या दिवसात जितका प्रखर, दक्ष आणि व्यावसायिक आहे तितकाच तो आज आहे,” बीसीसीआय अध्यक्षांनी म्हटले. “फरक एवढाच आहे की आता त्याला भारतासाठी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करायची नाही, जे मला कठीण वाटत होते कारण त्याला जगातील सर्वोत्कृष्ट गोलंदाजांचा सामना करावा लागला ज्यांच्याविरुद्ध त्याने दीर्घ कालावधीसाठी अपवादात्मक कामगिरी केली होती,” ते पुढे म्हणाले. बीसीसीआयचे प्रमुख असल्याने, गांगुलीने द्रविडला भारतीय प्रशिक्षक म्हणून नियुक्त करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.