भारताचा सलामीवीर फलंदाज शुभमन गिल, (Shubhman Gill) जो डेंग्यूने त्रस्त होता आणि त्याच्या प्लेटलेट्सची संख्या एक लाखाच्या खाली गेल्यामुळे त्याला चेन्नईच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, त्याला डिस्चार्ज देण्यात आला आहे, जरी त्याचा पाकिस्तानविरुद्ध 14 ऑक्टोबर रोजी अहमदाबादमध्ये खेळणे संशयास्पद आहे. गिल यांच्या प्लेटलेटची संख्या कमी झाल्याने त्यांना रविवारी रात्री रुग्णालयात दाखल करण्यात आले. (हेही वाचा - Shubman Gill Hospitalised: Dengue झालेल्या शुभमन गिल च्या प्लेट्लेट्स खालावल्या, चैन्नईत हॉस्पिटल मध्ये दाखल)
8 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पहिला सामना शुभमन खेळू शकला नव्हता. गेल्या आठवड्यात चेन्नईत आल्यानंतर गिलला डेंग्यूची लागण झाल्याचे आढळून आले होते. बुधवारी अफगाणिस्तानविरुद्ध भारताचा दुसरा सामनाही तो खेळू शकणार नाही. बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितले की, “चेन्नईतील टीम हॉटेलमध्ये शुभमनला ड्रिप देण्यात येत होती, परंतु त्याच्या प्लेटलेटची संख्या 70,000 पर्यंत घसरली. प्लेटलेटची संख्या एक लाखाच्या खाली गेल्यावर रुग्णालयात दाखल करणे आवश्यक असते. प्लेटलेटची संख्या एक लाखाच्या वर गेल्यावर त्याला डिस्चार्ज दिला जाईल.
गिलला चेन्नईतील कावेरी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून भारतीय संघाचे डॉक्टर रिझवान त्यांच्या प्रगतीवर लक्ष ठेवून असल्याचे समजते. डेंग्यूमुळे शरीर कमकुवत होते आणि त्यातून बरे होण्यास वेळ लागतो. भारतीय कर्णधार रोहित शर्मानेही गिल लवकर बरा व्हावा याला आपले प्राधान्य असल्याचे म्हटले आहे.